आपल्या शरीरसौष्ठवासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता आणि निर्माता जॉन अब्राहम माजी जागतिक बॉक्सिंग विजेता डेव्हिड हायेच्या जोडीने भारतात मुष्ठियुद्धाचा प्रचार  करणार आहे. ‘ट्रान्सनॅशनल बॉक्सिंग रॅंकिंग बोर्डा’च्या आकडेवारीनुसार हाये हा जगातील तिस-या क्रमांकाचा हेविवेट मुष्ठियोद्धा असल्याचे जॉनने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. हाये सध्या दुबईत आपली ‘हायेमेकर जीम’ नावाची व्यायामशाळा उघडण्याच्या कामात व्यस्त असून, हा ब्रिटिश बॉक्सर भारतात जॉन अब्राहम आणि त्याच्या जेए फिटनेस शाखाशी सलग्न होण्यास उत्सुक आहे. 

Story img Loader