‘भाग मिल्खा भाग’ च्या यशानंतर आता ‘मद्रास कॅफे’  चित्रपट करमुक्त होऊ पाहत आहे. ‘मद्रास कॅफे’ चित्रपटामध्ये प्रासंगीक विषय हातळला असल्यामुळे आणि सामाजिक आशय असल्याने चित्रपटाचे निर्माते शासनाकडे चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी विनंती करणार आहे.
“भारतीय इतिहासामध्ये ‘मद्रास कॅफे’ चित्रपटाने अत्यंत महत्वाचा अध्याय सुरू केला आहे. चित्रपट प्रदर्शीत झाला त्यावेळी तो श्रीलंकेसंदर्भात आहे असे वाटत होते. शेवटी चित्रपट राजीव गांधीच्या हत्येबाबत असल्याचे पुढे आले. चित्रपटामध्ये कोणत्याही प्रकारच्या दहशतवाद आणि हिंसाचारावर भाष्य करण्यात आले आहे. ‘मद्रास कॅफे’  चित्रपटातून अत्यंत मार्मिक असा संदेश देण्यात आला असल्यामुळे या चित्रपटाचे करमुक्त होणे गरजेचे आहे,” अशी माहिती चित्रपटाशी संबंधीत सूत्रांनी दिली.
‘मद्रास कॅफे’ चित्रपटाला करमुक्त करण्याआधी चित्रपटाचा अभिनेता जॉन अबराहम आणि सहअभिनेता सुजित सिरकार चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया येतात त्यांची वाट पाहत आहेत.
“चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यातील आकडे चित्रपट प्रेक्षकांना आवडल्याचे सांगतात. दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील चित्रपटाची वाटचाल सकारात्मक आहे. ‘भाग मिल्खा भाग’ प्रमाणेच चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी प्रेक्षकांना  ‘मद्रास कॅफे’ या चरित्रात्मक चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा इतिहासामध्ये नेले आहे. जास्तित जास्त लोकांना चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहता यावा यासाठीच चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी आम्ही करणार आहोत.”, असे चित्रपट निर्मात्यांच्या एका सहकाऱ्याने सांगितले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा