जॉन अब्राहम आणि नरगिस फक्री अभिनीत ‘मद्रास कॅफे’ चित्रपटातील कोणतेही दृश्य न वगळता मुद्रण नियंत्रक मंडळाने (सेन्सॉर बोर्ड) त्यास ‘यूए प्रणाणपत्र’ दिले आहे. हेरगिरीवर आधारित ‘मद्रास कॅफे’ चित्रपटाचे दिग्दर्शन शूजीत सरकार याने केले आहे. शूजीत म्हणाला की, चित्रपटातील कोणतेही दृश्य न वगळता चित्रपटास ‘यूए प्रमाणपत्र’ मिळाल्याने मी खूप खूश आहे. हा आमच्यासाठी फार खास चित्रपट असून प्रेक्षकांना लवकरच हा राजकीय नाट्यावरील रोमांचक चित्रपट पाहण्यास मिळणार आहे.
‘मद्रास कॅफे’ चित्रपट श्रीलंकेतील १९९० साली झालेल्या नागरि युद्धावर आधारित आहे. याचे चित्रीकरण श्रीलंका, मलेशिया, थायलंड आणि चेन्नई येथे चित्रीत करण्यात आले आहे. चित्रपटात जॉनने रॉ गुप्तहेराची तर नरगिस फक्रीने आंतरराष्ट्रीय पत्रकाराची भूमिका केली आहे.
जेए एंन्टरटेन्मेंट आणि रायसिंग सन फिल्मस यांची संयुक्त निर्मिती असलेला ‘मद्रास कॅफे’ २३ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा