हॉलिवूड अभिनेते अरनॉल्ड श्वार्जनेगर आणि सिल्वेस्टर स्टेलोन यांचा ‘इस्केप प्लान’ अलीकडेच भारतात प्रदर्शित झाला आहे. ज्या कंपनीने या चित्रपटाचे भारतात वितरक अधिकार विकत घेतले आहेत, तीच कंपनी आता याचा हिंदीत रिमेक बनवण्याचा विचार करत आहे. या अँक्शन चित्रपटासाठी जॉन अब्राहम आणि अक्षय कुमारला घेण्याची तयारी सुरू आहे. हा चित्रपट पूर्णपणे अँक्शन चित्रपट आहे, त्यामुळे अक्षय आणि जॉनच यासाठी परफेक्ट असल्याची चर्चा आहे. यापूर्वी दोघांनी ‘गरम मसाला’, ‘देसी बॉइज’ आणि ‘हाऊसफुल 2’ मध्ये एकत्र काम केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा