‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’ चित्रपट अभिनेता जॉनी डेप त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पूर्वाश्रमीची पत्नी अँबर हर्डच्या विरोधात जॉनीने पुन्हा एकदा कोर्टात मानहानीचा अर्ज दाखल होता, त्यामुळे ते दोघेही सातत्याने चर्चेत आहेत. दरम्यान, हा मानहानीचा खटला जॉनी डेपने जिंकला आहे. त्यामुळे आता अँबर हर्डला जॉनी डेपला १५ मिलियन डॉलर म्हणजे ११६ कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागणार होते. मात्र, आता जॉनीच्या वकिलाने खुलासा केला की, हा खटला कधीही पैशांबाबत नव्हता, तर त्याचं नाव आणि प्रतिष्ठा पुन्हापरत आणण्यासाठी होता. अशा स्थितीत एवढी मोठी रक्कम भरावी लागणार नसल्याने अँबरने सुटकेचा नि:श्वास सोडला असल्याचे मानले जात आहे. मात्र, वकिलाने हावभावांमध्ये एक ‘अट’ही नमूद केली आहे.
आणखी वाचा : सासूबाईंचे झाले होते निधन, पण प्रोडक्शनच्या लोकांनी सांगितलं “हसतानाची रिअॅक्शन देऊन जा”
गुड मॉर्निंग अमेरिकाचे होस्ट George Stephanopoulos यांनी जॉनी डेपचे वकिल Benjamin Chew यांना याविषयी सांगितले आहे. हा मानहानीचा खटला कधीही पैशांबाबत नव्हता, असे ते म्हणाले. अँबर हर्डने या प्रकरणी आणखी अपील केली नाही तर जॉनी त्याच्याकडून नुकसानभरपाई घेणार नाही, असे होऊ शकते , असे Benjamin Chew म्हणाले आहेत.
आणखी वाचा : ‘द काश्मीर फाइल्स’ची कहाणी खोटी म्हणणाऱ्या नसीरुद्दीन शाहंना, विवेक अग्निहोत्रीने दिले उत्तर
बेंजामिन च्यु म्हणाले, ‘आम्ही कोणत्याही वकील-क्लायंटमधील परस्परसंवाद स्पष्टपणे उघड करू शकत नाही, परंतु जॉनी डेपने साक्ष दिल्याप्रमाणे आणि आम्ही दोघांनी आपापल्या क्लोजिंगमध्ये स्पष्ट केले की ते सगळं पैशासाठी नव्हतं तर हे त्याची गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी होतं.
आणखी वाचा : शिल्पा शेट्टीने ४७ व्या वाढदिवसानिमित्त स्वतःला भेट दिली एक लक्झरी व्हॅनिटी व्हॅन, पाहा फोटो
अँबर हर्ड आणि जॉनी डेप यांच्या मानहानीच्या खटल्याची कोर्टात ६ आठवडे सुनावणी झाली. जिथे ज्युरीने जॉनीच्या बाजूने निकाल दिला. अँबरला जॉनी ११६ कोटी नुकसानभरपाई द्यावी लागेल. तर, न्यायालयाने जॉनीला काही प्रकरणांमध्ये दोषी ठरवले, म्हणून त्याला अँबरला २ मिलियन डॉलर भरपाई म्हणून देण्याचा आदेश देण्यात आले.
आणखी वाचा : अक्षयला होती सासू डिंपल कपाडियासोबत डेटवर जाण्याची इच्छा, कारण…
अशी झाली वादाची सुरुवात
घटस्फोटानंतर अँबर हर्डने दावा केला होता की जॉनी डेप दारूच्या नशेत तिला मारहाण करायचा. मात्र जॉनी डेपने हे आरोप फेटाळून लावले. २०१८ मध्ये अँबर हर्डने मध्ये वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक ओपिनियन पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये त्याने स्वत:ला घरगुती हिंसाचारातून वाचलेले असल्याचे सांगितले होते. अँबर हर्डने त्यात जॉनी डेपचे नाव घेतले नाही, पण ती त्याच्याकडे बोट दाखवत असल्याचे दिसून आले होते. जॉनी डेपलाही याची जाणीव झाली आणि त्यांनी अँबर हर्डवर मानहानीचा खटला दाखल केला होता.