हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) आणि त्याची पूर्वश्रमीची पत्नी एंबर हर्ड (Amber Heard) मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. या दोघांचा खटला न्यायालयात सुरू असून याच्या सुनावणीदरम्यान दोघांनीही एकमेकांवर धक्कादायक आरोप केले आहे. जॉनीने आपल्यासोबत लैंगिक अत्याचार केल्याचं देखील तिने म्हटलं होतं. आता जॉनीने एम्बरचे इलॉन मस्क (Elon Musk)सोबत शारीरिक संबंध असल्याचे आरोप केले आहेत. हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला असून सर्वत्र याची चर्चा सुरु आहे.
जॉनीच्या आरोपानंतर सोशल मीडियावरहीच चर्चा रंगली आहे. मात्र, इलॉन मस्क यांच्या ट्वीटनंतर जॉनीच्या या चर्चांना आणखी हवा मिळाली. एका नेटकऱ्याने जॉनी एम्बरच्या या खटल्यावर केलेल्या ट्वीटवर इलॉन मस्कने ट्वीट करत “मी आशा करतो की तुम्ही दोघेही मागचं सगळं सोडून पुढे जाल. तुम्ही दोघे तुमच्या कामात तुमच्या पद्धतीने सर्वोत्तम आहात.”
आणखी वाचा : करण जोहरच्या पार्टीत सलमान आणि ऐश्वर्या आले समोरा-समोर, अन् अभिषेकने केले असे काही…
आणखी वाचा : “२.३० तासात तू दोन महाराजांची…”, प्रवीण तरडे यांच्यासाठी प्राजक्ता माळीची खास पोस्ट
दुसरीकडे इलॉन मस्क यांच्यासोबतच्या संबंधांवर एम्बरने स्पष्टीकरण दिलं होतं. एम्बर म्हणाली, “मी इलॉनला मेट गाला सोहळ्यात भेटले होते. जेव्हा मी जॉनीसोबत मेट गालामध्ये उभी होते तेव्हा मी पहिल्यांदा इलॉनला पाहिलं होतं. त्यापूर्वी आम्ही कधीही भेटलो नव्हतो आमची साधी ओळखही नव्हती.”