पायरेट्स ऑफ द कॅरेबियन चित्रपट अभिनेता जॉनी डेप त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. पूर्वाश्रमीची पत्नी एम्बर हर्डच्या विरोधात जॉनीने पुन्हा एकदा कोर्टात मानहानीचा अर्ज दाखल केल्याने ते दोघेही सातत्याने चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जॉनी डेप आणि एम्बर हर्डचा सुरु असलेला मानहानीचा खटला जॉनी डेपने जिंकला आहे. त्यामुळे आता एम्बर हर्डला जॉनी डेपला १५ मिलियन डॉलर म्हणजे ११६ कोटी द्यावे लागणार आहे. सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने याबाबतचा निकाल दिला आहे. याप्रकरणी प्रदीर्घ चर्चा, साक्ष, आणि अनेक पुरावाच्या विचार विनमयानंतर या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली.
सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार, अंबर हर्डला १० मिलियन डॉलर म्हणजेच ७७ कोटी रुपये हे नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागणार आहेत. तर ५ मिलियन डॉलर ३८ कोटी रुपये ही दंडात्मक नुकसान म्हणून भरण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या निकालात अंबरने माझी बदनामी केली हे सिद्ध करण्यात जॉनी डेप यशस्वी ठरल्याचे ज्युरीने आपल्या निकालात म्हटले आहे.
सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या या निकालानंतर जॉनी डेपच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. जॉनी डेपचे अनेक चाहते हे मोठ्या संख्येने कोर्टाबाहेर जमा झाले आहेत. अनेकांनी या निकालानंतर सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली आहे.
जॉनी डेप आणि अंबर हर्ड यांच्यातील हायप्रोफाइल कायदेशीर लढाईदरम्यान गेल्या सहा आठवड्यांपासून अनेक साक्षीदारांचे जबाब ज्यूरीसमोर नोंदवले गेले. गेल्या सहा आठवड्यात शंभरहून अधिक तास साक्षीदार होते. दीर्घ साक्ष आणि वादविवाद झाल्यानंतर ज्युरीने हा निर्णय दिला आहे.
अशी झाली वादाची सुरुवात
घटस्फोटानंतर एम्बर हर्डने दावा केला होता की जॉनी डेप दारूच्या नशेत तिला मारहाण करायचा. मात्र जॉनी डेपने हे आरोप फेटाळून लावले. २०१८ मध्ये एम्बर हर्डने मध्ये वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक ओपिनियन पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये त्याने स्वत:ला घरगुती हिंसाचारातून वाचलेले असल्याचे सांगितले. हर्डने त्यात जॉनी डेपचे नाव घेतले नाही, पण ती त्याच्याकडे बोट दाखवत असल्याचे दिसून आले. जॉनी डेपलाही याची जाणीव झाली आणि त्यांनी एम्बर हर्डवर मानहानीचा खटला दाखल केला.
एम्बर हर्डबद्दल वापरले होते अपशब्द
एम्बर हर्डच्या वकिलाने डेप आणि त्याचा मित्र बारूच यांच्या काही चॅट्स उघड केले होते. यामध्ये जॉनी त्याच्या माजी पत्नीएम्बर हर्डबद्दल अपशब्द वापरताना दिसला. हर्डबद्दल बोलताना तो म्हणाले की, मला आशा आहे की हर्डचे प्रेत होंडा सिलिकच्या ट्रंकमध्ये कुजत असावे. वृत्तानुसार, जॉनीचा मित्र बारूचने कोर्टात कबुली दिली आहे की, जॉनीने हे लिहिलं होतं. तरी तो त्याच्या मित्राचा बचाव करताना दिसला.
एम्बर हर्ड आणि कारासोबत एलन मस्कचे थ्रीसम?
या प्रकरणातील सर्वात मोठा धक्कादायक खुलासा एलोन मस्कच्या थ्रीसमबाबत झाला आहे. त्यामुळे एलन मस्कचे नाव पुन्हा एकदा या प्रकरणात ओढले गेले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, २०१६ मध्ये एलन मस्क एम्बर हर्डच्या प्रेमात होते आणि तिच्यावर प्रेम करत होते. दोघेही एकत्र वेळ घालवत असत. नंतर एम्बर हर्डने देखील एका फोटोद्वारे एलन मस्कसोबतच्या तिच्या नातेसंबंधाची पुष्टी केली. आता पुन्हा एकदा इलॉन मस्कचे नाव चर्चेत आले आहे. जॉनी डेप आणि एम्बर हर्ड प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान जारी करण्यात आलेल्या दस्तऐवजांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की एलन मस्कने एम्बर हर्ड आणि मॉडेल-अभिनेत्री कारा डेलेव्हिंगने शारीरिक संबंध ठेवले होते. तिने २०१६ मध्ये जॉनी डेप आणि हर्डच्या लॉस एंजेलिस येथील घराममध्ये थ्रीसम केले. त्यावेळी जॉनी डेप शूटिंगच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियात होता.