बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ‘जॉली एलएलबी २’ हा चित्रपट गेल्या शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी या चित्रपटाला काहीसा थंड प्रतिसाद होता. मात्र, त्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखविली. सध्या, अक्षयचा ‘जॉली एलएलबी २’ हा चित्रपट शाहरुखचा ‘रईस’ आणि हृतिक रोशनचा ‘काबिल’ यांच्यापेक्षा वरचढ ठरत असल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘जॉली एलएलबी २’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या तीन दिवसांतच ५० कोटींचा गल्ला पार केला. त्यानंतर सोमवारी कामाचा दिवस असतानाही चित्रपटाला प्रेक्षकांचा ब-यापैकी प्रतिसाद मिळाला. सोमवारी ‘जॉली एलएलबी २’ने केवळ १५ कोटी रुपयांचा गल्ला जमविला. पण, हा आकडा या वर्षीचे हिट चित्रपट असलेल्या ‘रईस’ आणि ‘काबिल’ यांनी चौथ्या दिवशी केलेल्या कमाईपेक्षा तरी निदान जास्तच होता. त्यामुळे प्रदर्शनाच्या एका आठवड्यातच अक्षयचा चित्रपट १०० कोटींचा गल्ला पार करण्याची शक्यता आहे. या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला पार केल्यास अक्षयचा हा १०० कोटी क्लबमधील चौथा चित्रपट असेल.

‘जॉली एलएलबी २’चे चार दिवसांतील बॉक्स ऑफिस कलेक्शन
पहिला दिवस (१० फेब्रुवारी, शुक्रवार) – १३.२० कोटी
दुसरा दिवस (११ फेब्रुवारी, शनिवार) – १७.३१ कोटी
तिसरा दिवस (१२ फेब्रुवारी, रविवार) – १९.९५ कोटी
चौथा दिवस (१३ फेब्रुवारी, सोमवार) – १५ कोटी

सुभाष कपूर दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी २’ चित्रपट हा २०१३ साली आलेल्या ‘जॉली एलएलबी’चा सिक्वल आहे. अर्शद वारसीने प्रमुख भूमिका साकारलेल्या या चित्रपटाचेही दिग्दर्शन सुभाष कपूरनेच केले होते.

‘जॉली एलएलबी २’ची कथाही कोर्टातील एका केसभोवती गुंफण्यात आलीये. लखनऊमधील रहिवासी जगदिश्वर मिश्र (अक्षय कुमार) याला वकिलीच्या करिअरमध्ये मोठं काहीतरी करायचं आहे. पण घरच्या स्थितीमुळे त्याला एका ज्येष्ठ वकिलाच्या कार्यालयात दुय्यम स्वरुपाचं काम करावं लागतं. पण त्याच्यातील जिद्द कायम आहे. लखनऊमधील न्यायालयात स्वतःच स्वतंत्र चेंबर असावं, अशी इच्छा त्याची असते. त्यासाठी लागणारा पैसाही त्यानं जमवलेला असतो. पण ऐनवेळी तो कमी पडतो. मग खोटं बोलून तो न्यायालयात त्याला रोज भेटणाऱ्या आणि न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या एका महिलेची फसवणूक करून तिच्याकडून पैसे घेतो. यानंतर काय घडते. त्यातून पुढे कथानकाला कशी वळणे मिळतात. खुद्द जगदिश्वर मिश्र याच्यावर काय काय संकटे कोसळतात… या सगळ्यातून ‘जॉली एलएलबी २’ची कथा पुढं जाते आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jolly llb 2 box office collection day 4 akshay kumars film aces the monday test