‘वन बाय टू’ आणि ‘व्हॉट द फिश’ चित्रपटात अभिनय केलेली बॉलिवूड अभिनेत्री गीतिका त्यागीने ‘जॉनी एलएलबी’चा दिग्दर्शक सुभाष कपूरवर विनयभंगाचा आरोप केला आहे. गीतिकाने याबाबतचा व्हिडिओ ‘सुभाष कपूरचा खरा चेहरा’ या नावाने टि्वटर या सोशल नेटवर्किंग साईटवर प्रसिद्ध केला आहे. हा व्हिडिओ छुप्या कॅमेऱ्याद्वारे रेकॉर्ड करण्यात आला असून, यात दिग्दर्शक सुभाष कपूर, त्याची पत्नी डिंपल खरबंदा आणि गीतिका या घटनेबाबत चर्चा करताना दिसतात. गीतिकाला हा व्हिडिओ टि्वटरवर प्रसिद्ध करण्यासाठी सहकार्य करणारा ‘औरंगजेब’ चित्रपटाचा दिग्दर्शक अतुल सब्रवालदेखील या व्हिडिओमध्ये दिसतो.

 

 

 

Story img Loader