हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप आणि त्याची पत्नी एंबर हर्ड सध्या त्यांच्या घटस्फोटाच्या केसमुळे जगभरात चर्चेत आहेत. जॉनी डेपनं त्याची पूर्वश्रमीची पत्नी एंबर हर्डच्या विरोधात ५० मिलियन डॉलरची मानहानीची याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सध्या सुनावणी सुरू असून जॉनी डेपचं स्टेटमेंट नोंदवून घेतल्यानंतर आता एंबरचं स्टेटमेंट नोंदवून घेण्यात आलं. गुरुवारी जेव्हा एंबर स्टेटमेंट देण्यासाठी न्यायलयात हजर झाली तेव्हा स्वतःवर झालेल्या लैंगिक अत्याचारांबद्दल सांगताना एंबर ढसाढसा रडली.
मिळालेल्या माहितीनुसार एंबर हर्डनं सांगितलं की, तिचा पूर्वश्रमीचा पती जॉनी डेपनं तिचा लैंगिक छळ करण्यासोबतच फुटलेल्या काचेच्या बॉटलच्या सहाय्याने चेहरा बिघडवून टाकण्याची धमकी दिली होती. एंबरच्या म्हणण्यानुसार ही घटना त्यांच्या लग्नाच्या केवळ एक महिन्यानंतर घडली होती. आपलं स्टेटमेंट देताना एंबरनं तिचा अनेकदा लैंगिक आणि शारीरिक छळ झाल्याचं स्पष्ट केलं. या घटना २०१५ साली ऑस्ट्रेलियामध्ये घडल्या होत्या. त्यावेळी जॉनी डेप त्याची लोकप्रिय वेबसीरिज ‘पाइरेट्स ऑफ द कॅरेबियन’च्या पाचव्या सीझनचं शूटिंग करत होता.
आणखी वाचा- पतीसोबत रोमांस करताना दिसली सपना चौधरी, इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल
एंबर म्हणाली, “त्याने माझ्यावर दारूची बॉटल फेकून मारली होती. पण देवाच्या कृपेनं मी या हल्ल्यातून वाचले. जॉनी माझ्यावर सातत्यानं सोडा आणि बियरच्या बॉटल फेकून मारत होता. माझ्यावर जोरजोरात ओरडत होता की मी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्यामुळे आता तो फुटलेल्या काचेच्या बॉटलने माझा चेहरा बिघडवून टाकणार आहे. त्यानंतर त्यानं माझा नाईट गाऊन फाडून टाकला आणि त्याच बॉटलने माझ्यावर लैंगिक अत्याचार केले.” हे सर्व सांगत असताना एंबरला अश्रू अनावर झाले आणि ती ढसाढसा रडू लागली.
आणखी वाचा- खरंच कार्तिक आर्यनला वैतागलंय त्याचं कुटुंब? म्हणाला; “माझ्यामुळे त्यांना खूप त्रास…”
यानंतर एंबरनं एका धक्कादायक घटनेबाबत खुलासा केला. ती म्हणाली, “त्याने माझ्या प्रायव्हेट पार्टमध्ये बॉटल घुसवली. तो मला सतत जीवे मारण्याची धमकी देत होता. मी कसं तरी माझा जीव वाचवण्यासाठी तिथून पळाले. जेव्हा मी दुसऱ्या दिवशी माझ्या बेडरुमधून खाली आले त्यावेळी जॉनी तिच्या रक्ताळलेल्या बोटाने भितींवर आणि इतर ठिकाणी काहीही मेसेज लिहित होता. त्याच्या बोटाला दुखापत कशामुळे झाली हे मला माहीत नव्हतं. पण त्यानं संपूर्ण घरात रक्तानं मेसेज लिहून ठेवले होते.”