आपल्या देशात फिल्मस्टार्स आणि त्यांच्या लाखो-करोडो चाहत्यांमधील नातं आपल्याला ठाऊक आहेच. काही चाहते हे त्यांच्या लाडक्या सुपरस्टारसाठी कोणत्याही थराला जातात. अशीच काहीशी घटना नुकतीच विजयवाडा येथील एका चित्रपटगृहात घडली आहे. २००३ साली प्रदर्शित झालेला ज्युनिअर एनटीआरचा ‘सिम्हाद्री’ हा चित्रपट नुकताच त्याच्या वाढदिवसानिमित्त दक्षिणेतील काही चित्रपटगृहांत पुन्हा प्रदर्शित करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या वेळी ज्युनिअर एनटीआरच्या काही चाहत्यांनी चित्रपटगृहांत फटाके फोडल्याने आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. विजयवाडा येथील ‘अप्सरा’ चित्रपटगृहात ही दुर्घटना घडल्याचं स्पष्ट झालं आहे. चाहत्यांनी आनंदात फटाके फोडल्याने काही खुर्च्यांचे नुकसान झाले आहे. चित्रपटगृहात आग लागल्याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : “आलियाच्या लग्नाच्या खर्चासाठी…” मुलीच्या साखरपुड्याबद्दल समजताच अनुराग कश्यपची ‘ती’ पोस्ट चर्चेत

या व्हिडीओवर बऱ्याच लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी चाहत्यांच्या या वर्तनावर टीका केली आहे. “असे गैरवर्तन खपवून नाही घ्यायला हवे” असं एका युजरने लिहिलं. तर एका युजरने लिहिलं की, “हे फार वाईट आहे. याची भरपाई कोण करणार? यात चित्रपटगृहाच्या मालकांचं नुकसान आहे.” फक्त भारतातच नव्हे तर लंडनमधील एका चित्रपटगृहातही अशीच एक घटना घडल्याचं स्पष्ट झालं आहे. तिथंही ज्युनिअर एनटीआरच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये फटाके फोडल्याने लोकांना त्वरित तिथून बाहेर काढण्यात आलं.

२००३ साली प्रदर्शित झालेला एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘सिम्हाद्री’ हा चित्रपट तेव्हा चांगलाच गाजला होता. ज्युनिअर एनटीआरच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त हा चित्रपट पुन्हा काही ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला. २००३ मध्ये पहिल्याच दिवशी या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेकिंग ५.१४ कोटींची कमाई केली होती. आता ज्युनिअर एनटीआर हा सैफ अली खान आणि जान्हवी कपूरसह त्याच्या आगामी चित्रपटावर काम करत आहे.