दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर हा एस. एस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ या दाक्षिणात्य चित्रपटात झळकला होता. या चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर नाव कोरले होते. आता लवकरच ज्युनिअर एनटीआर हा कोराताला शिवा या चित्रपटात झळकणार आहे. तसेच तो आणखी एका तेलुगू चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव एनटीआर ३० असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटाच्या अपडेटसाठी अनेक चाहते त्याच्या पोस्टवर कमेंट करताना दिसतात.

मात्र नुकतंच ज्युनिअर एनटीआरने याबद्दल थेट मत व्यक्त केले आहे. त्याबरोबर त्याने चाहत्यांना अतिशय नम्रपणाने याबद्दल सांगितले आहे. “तुम्ही सतत चित्रपटाशी संबंधित माहिती विचारल्याने माझ्यावर दबाव येतो”, असे त्याने यावेळी म्हटले आहे.
आणखी वाचा : “माणसाचं वय…” रेणुका शहाणे आणि शाहरुख खानमध्ये रंगलेल्या संभाषणादरम्यान अभिनेत्रीच्या पतीने केलेले ‘ते’ ट्वीट चर्चेत

Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Vanchit Bahujan Aaghadi Maharashtra Assembly Election Results 2024
वंचितही ईव्हीएमविरोधात आक्रमक, थेट निवडणूक आयोगाला पत्र; विचारले ‘हे’ तीन प्रश्न
swapnil rajshekhar tula shikvin changalach dhada
“केरळ फिरतोय, पैसे फुकट गेले…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याची उपरोधिक पोस्ट; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
News About Rahul Narwerkar
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज भरणार? राजकीय वर्तुळात चर्चा काय?
Saleel Kulkarni Share Special Post For Devendra Fadnavis of New Chief Minister Of Maharashtra
“एखाद्याने स्वप्न पाहावे आणि पूर्ण करावे तर असे”, देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानिमित्ताने सलील कुलकर्णींची खास पोस्ट, म्हणाले…

“कधीकधी आम्ही जेव्हा एखाद्या चित्रपटावर काम करत असतो, तेव्हा त्यासंबंधित माहिती शेअर करण्यासाठी फारशी माहिती उपलब्ध नसते. आम्ही प्रत्येक तास आणि दररोज याबद्दल तुम्हाला अपडेट देऊ शकत नाही. मी तुमचा उत्साह समजू शकतो, पण कधीकधी या सर्व गोष्टींमुळे निर्माते आणि दिग्दर्शक हे फार दबावाखाली येतात. अनेकदा दबावामुळे आम्ही अशी माहिती देतो ज्याचे कोणतेही मूल्य नसते आणि त्यामुळे चाहत्यांची निराशा होऊ शकते.

हा दबाव फक्त मला एकट्याला नव्हे तर अनेकांना जाणवतो. पण ही गोष्ट चांगली नाही. आमच्याकडे काही अपडेट असल्यास आम्ही ते सर्वात आधी आमच्या चाहत्यांपर्यंत शेअर करतो. अनेक गोष्टी तर आम्ही आमच्या पत्नीला घरी सांगण्यापूर्वी चाहत्यांना सांगत असतो. त्यांना नवनवीन माहिती देत असतो. कारण तुम्ही आमच्यासाठी किती मौल्यवान आहात याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे”, असे ज्युनिअर एनटीआर म्हणाला.

आणखी वाचा : Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding : सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचा शाही थाट, संगीत पार्टीचा पहिला व्हिडीओ समोर

दरम्यान दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचे जगभरात चाहते आहेत. ज्युनिअर एनटीआरने आपल्या अभिनयाच्या जोरावर कलासृष्टीमध्ये आपलं स्थान बळकट केलं. ज्युनिअर एनटीआर दिसायला साधा असला तरी तो कोट्यावधी रुपयांचा मालक आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्यांच्या यादीमध्ये ज्युनिअर एनटीआरचं नाव आवर्जून घेतलं जातं. तो कायमच सोशल मीडियावर सक्रीय असतो.

Story img Loader