अभिनेता ज्युनिअर एनटीआर हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. तो अनेकदा त्याचे चित्रपट आणि अभिनयामुळे चर्चेत असतो. एनटीआर ज्युनिअर लवकरच बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘आरआरआर’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस.एस.राजामौली यांनी केले आहे. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील अनेक दृश्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
आरआरआर या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एसएस राजामौली यांनी एनटीआर ज्युनियरने शूट केलेल्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या धावण्याच्या त्या दृश्यमागची कहाणी सांगितली आहे. ज्युनिअर एनटीआरच्या त्या सीनबद्दल बोलताना राजामौली म्हणाले की, या चित्रपटातील त्याच्या भूमिकेतील व्यक्तिरेखेनुसार शरीर बनवण्यासाठी त्याला जवळपास पाच ते सहा महिने लागले. विशेष म्हणजे बल्गेरियाच्या जंगलात तो अनवाणी धावला.
ज्युनिअर एनटीआर याने त्याच्या या सीनची रिहर्सल शूज परिधान केली होती. मात्र ज्यादिवशी हा सीन चित्रित झाला त्यादिवशी त्याने सर्वांनाच चकित केले. या सीनच्या शूटींगदरम्यान त्याला बल्गेरियाच्या काटेरी जंगलात अनवाणी धावण्याची सूचना करण्यात आली. विशेष म्हणजे त्यानेही तो सीन अनवाणी केला. पण सुदैवाने त्याच्या पायला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र जंगलातील टोकेदार दगडांवर त्याचा पाय पडल्यामुळे त्याला काही प्रमाणात दुखापत झाली होती.
‘मी देखील हे जग सोडून जाईन’ जॅकी श्रॉफ यांचा व्हिडीओ चर्चेत
‘RRR’ मध्ये ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण तेजा यांनी अल्लूरी सीता रामराजू आणि कोमाराम भीम या दोन स्वतंत्र्य सैनिकांच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट सुरुवातीला ७ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता मात्र देशभरात करोना रुग्णाची संख्या झपाट्यानं वाढल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.