दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. भारतासह जगभरातल्या प्रेक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले. ऑस्कर्ससाठी हा चित्रपट भारताकडून अधिकृतरित्या पाठवण्यात यावा अशी मागणी व्हायला लागली. या चित्रपटाच्या निमित्ताने रामचरण आणि ज्यूनिअर एनटीआर हे तेलुगू चित्रपटसृष्टीतील दोन सुपरस्टार्स एकत्र ऑनस्क्रीन दिसले.

राजामौली सध्या अमेरिकेमध्ये आहेत. त्यांना टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे खास आमंत्रण देण्यात आले होते. त्यांचा ‘आरआरआर’ हा ब्लॅकबास्टर चित्रपट लॉस एंजेलिस शहरातील सर्वात मोठ्या आयमॅक्स चित्रपटगृहामध्ये दाखवण्यात आला. हा चित्रपट पाहण्यासाठी अमेरिकन नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. चित्रपट सुरु असताना प्रेक्षक टाळ्या-शिट्यांच्या माध्यमातून चित्रपटाला दाद देत होते. चित्रपट संपल्यानंतर राजामौली यांच्या एन्ट्रीवर प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या. या सन्मानाबद्दल त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले.

आणखी वाचा – विवेक अग्निहोत्रींनी मुंबईत खरेदी केले नवे आलिशान घर, किंमत ऐकून थक्क व्हाल

लॉस एंजेलिसमधल्या या खास स्क्रीनिंग दरम्यानचा व्हिडीओ राजामौली यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ रिशेअर करत ज्यूनिअर एनटीआर यांनी राजामौली सरांचे कौतुक केले आहे. त्यांनी या पोस्टवर “जक्कन्ना तुम्ही होणाऱ्या कौतुकासाठी पात्र आहात” असे लिहिले आहे. जकन्ना हे राजामौली यांचे टोपणनाव आहे. या व्हिडीओमध्ये ते चित्रपटगृहाच्या पडद्यासमोर उभे राहून प्रेक्षकांशी संवाद साधताना दिसत आहेत. प्रेक्षकांसमोर गेल्यावर त्यांच्यासाठी सर्वजण आदरपूर्वक उभे राहून टाळ्या वाजवत होते. व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी “मला, माझ्या चित्रपटाला आणि त्यातील नायकांना प्रेम दिल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद अमेरिका” असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा – ‘मिर्झापूर’मधील ‘कालिन भैय्या’ दिसणार नव्या भूमिकेत; पंकज त्रिपाठीला निवडणूक आयोगाने ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून केले घोषित

‘व्हरायटी’ या आंतरराष्ट्रीय मासिकाने एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाला ऑस्कर २०२३ मध्ये एक नव्हे, तर दोन विभागांमध्ये नामांकन मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. त्यासह ज्यूनिअर एनटीआर आणि राम चरण या दोघांनाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीमध्ये नामांकन मिळणार आहे असे म्हटले जात आहे. चित्रपटाच्या टीमने अकॅडमी अवॉर्ड्समधील प्रत्येक श्रेणीमध्ये नामांकन मिळावे यासाठी त्यांना पत्र लिहिले आहे.

Story img Loader