‘बाहुबली’नंतर दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत अनेक विक्रम मोडीत काढले. या चित्रपटामध्ये ज्यूनिअर एनटीआर आणि रामचरण हे दोन सुपरस्टार प्रमुख भूमिकेमध्ये आहेत. तर आलिया भट्ट, देवगण आणि श्रिया सरन यांनी सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. मध्यंतरी हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवला जावा अशी मागणी चाहते करत होते.

भारतासह जगभरातल्या प्रेक्षंकानी ‘आरआरआर’चे कौतुक केले आहे. या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस.राजामौली सध्या अमेरिकेमध्ये आहेत. या अमेरिका दौऱ्यामध्ये त्यांना अनेक कार्यक्रमांमध्ये आमंत्रित केले जात आहे. लॉस एंजेलिसमध्ये ‘आरआरआर’चे स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आले होते. या स्क्रीनिंग दरम्यानच्या व्हिडीओमध्ये परदेशी प्रेक्षक हा चित्रपट पाहण्याचा आनंद घेत असल्याचे दिसत आहेत. ‘बाहुबली’, ‘आरआरआर’ या चित्रपटांचे चाहते जगभरात पसरले आहेत.

आणखी वाचा – “रेल्वे स्टेशनवरील पाणी बिसलेरीपेक्षा…” सोनू सूदने शेअर केला मुंबई लोकलचा अनुभव

दरम्यान ज्यूनिअर एनटीआरने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तो लॅपटॉपवर एका व्यक्तीशी संवाद साधताना दिसत आहे. या फोटोला त्याने “जपानी मीडियासह आरआरआरचा अनुभव पुन्हा घेताना..” असे कॅप्शन दिले आहे. तसेच चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्याने चाहत्यांचे आभार सुद्धा मानले आहेत. या ट्वीटवरुन एनटीआरने ‘आरआरआर’ हा चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे संकेत दिले आहे.

आणखी वाचा – “हळदी कुंकूचा हट्ट नाही पण…” हेमांगी कवी स्पष्टच बोलली

या बिगबजेट चित्रपटामध्ये ज्यूनिअर एनटीआरने कोमाराम भीम हे पात्र साकारले आहे. एस.एस.राजामौली यांच्या पहिल्या चित्रपटामध्येही त्याने मुख्य नायक साकारला होता. त्याने राजामौलींसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते दोघे खूप चांगले मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी ज्यूनिअर एनटीआरने त्यांचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

Story img Loader