सध्या ओटीटीविश्वात सस्पेन्स, मर्डर मिस्ट्री अशा गोष्टी फार चालतात. प्रेक्षक अत्यंत आवडीने या गोष्टी बघतो. त्यामुळेच ओटीटीवर या प्रकारचे चित्रपट आणि वेबसीरिज भरपूर बघायला मिळतात. नुकताच अक्षय कुमारचा प्रदर्शित झालेला ‘कटपुतली’सुद्धा याच पठडीतला असल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता Amazon च्या प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अशीच एक सस्पेन्स थ्रिलर वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिग्दर्शिका तनुजा चंद्रा हीची ‘हश हश’ या वेबसीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. तनुजा चंद्रा हिने याआधी इरफानच्या ‘करिब करिब सिंगल’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं आणि आता ती एक क्राईम थ्रिलर सीरिज आपल्यासाठी घेऊन येत आहे. या सीरिजमध्ये खासकरून भारतीय चित्रपटसृष्टीतल्या दिग्गज अभिनेत्री आपल्याला बघायला मिळणार आहे. जुही चावला, आयेशा झुलका, सोहा अली खान या अभिनेत्री या सीरिजमधून ओटीटीविश्वात पदार्पण करत आहेत. तर करिश्मा तन्ना, शहाना गोस्वामी, कृतिका कामरा या अभिनेत्रीही यामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरवरून तरी ही एक मर्डर मिस्ट्री वाटत असली तरी यात आपल्याला आणखी बऱ्याच गोष्टी बघायला मिळू शकतात.

या सगळ्या अनुभवाबद्दल जुहीने सांगितलं, “मी या सगळ्या प्रवासाकडे एक सुवर्णसंधी म्हणूनच बघते. प्राइम व्हिडिओसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मने मनोरंजनविश्वात वेगळीच क्रांति घडवून आणली आहे. यामुळेच देशभरातला प्रेक्षकवर्ग आजही त्यांच्याबरोबरीने उभा आहे.” सोहा अली खान आणि शहाना यादेखील या सीरिजसाठी उत्सुक आहेत. या सीरिजचं कथानक नक्कीच प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवेल असं त्यांचं म्हणणं आहे.

आणखी वाचा : विश्लेषण : आपल्या विनोदबुद्धीमुळे कित्येकांचा रोष ओढवून घेणाऱ्या, वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या कुणाल कामराविषयी जाणून घ्या

दिग्दर्शनासह तनुजा चंद्रा ही या सीरिजची सहनिर्मातीदेखील आहे. ही वेबसीरिज ७ भागांची असण्याची शक्यता आहे. येत्या २२ सप्टेंबरपासून ही वेबसीरिज प्राइम व्हिडिओवर तुम्हाला पाहता येऊ शकते.