बॉलीवूडची चुलीबुली अभिनेत्री जूही चावला हॉलीवूड चित्रपटात झळकणार आहे. ऑस्कर विजेता दिग्दर्शक स्टिवन स्पिलबर्गच्या ‘द हन्ड्रेड फूट जर्नी’ या चित्रपटात ती काम करत आहे.
लॅसी हॉलस्टॉर्मचे दिग्दर्शन असलेल्या ‘द हन्ड्रेड फूट जर्नी’ची निर्मिती स्टिवन स्पिलबर्ग करत आहे. सध्या या चित्रपटाचे मुंबईत चित्रीकरण सुरु आहे. फ्रान्सच्या छोट्या गावात स्थित होण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारतीय कुटुंबावर चित्रपटाची कथा आधारित असून, जूहीने ओम पुरीच्या पत्नीची भूमिका चित्रपटात केली आहे.
‘द हन्ड्रेड फूट जर्नी’ हा चित्रपट हेच नाव असलेल्या रिचर्ड सी मोरैसच्या कादंबरीवर आधारित आहे.

Story img Loader