कंगना रणावतच्या आगामी रज्जो चित्रपटातील जुल्मी रे जुल्मी गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटात तिने नाचणारीची भूमिका केली आहे. कंगना रणावतची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट मुजरा घराण्यावर आधारित आहे. तसेच, या चित्रपटात महेश मांजरेकरचीही भूमिका असून त्यांनी यात तृतीय पंथीयाची (षंढ) भूमिका साकरली आहे.
विश्वास पाटील दिग्दर्शित या चित्रपटाची कथा एक मुस्लिम मुलगी आणि ब्राम्हण मुलगा यांच्या प्रेमकथेवर चित्रीत करण्यात आली आहे. पारस अरोरा, प्रकाश राज, जया प्रदा आणि उपेंद्र लिमये यांच्या भूमिका असलेला ‘रज्जो’ १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा