प्रेमामध्ये कोणत्याही गोष्टीत फरक पडू दिला जात नाही. जे आहे ते आपुलकीने, प्रेमाने स्विकारणे म्हणजे प्रेम. उंची, रुप, दिसणे, आर्थिक-सामाजिक परिस्थिती याला जास्त मोल न देता प्रेमाला महत्त्व देणे महत्त्वाचे असते आणि हेच सोनी मराठी वाहिनीच्या ‘अपूर्वा आणि विजय’या जोडीने सिद्ध केलं आहे. मेमरी कार्ड रिकव्हरीच्या निमित्ताने अपूर्वाचं विजयच्या मल्टीपर्पज दुकानात येणं हे विधिलिखितच होतं. कारण अचानकपणे झालेल्या भेटीचं भविष्यात काहीतरी वेगळंच प्लॅनिग तयार झालेलं असतं. अनेक अडचणींना धैर्याने सामोरे गेल्यावर ‘जुळता जुळता जुळतंय की’ मालिकेत अपूर्वा आणि विजयच्या आयुष्यात आनंदी प्रसंग घडणार आहे.

कोल्हापूरमधील रंकाळा येथे एकदम हटके म्हणजे इतर मुलं गुलाब किंवा महागडं गिफ्ट देऊन प्रपोज करतात पण विजयने मात्र अपूर्वाला ऐतिहासिक वारसा असलेल्या ऱंकाळाच्या मधोमध जाऊन अनोख्या पद्धतीने लग्नाची मागणी घातली होती आणि अपूर्वाने ती मागणी स्विकारली. विजय- अपूर्वाने आपल्या घरी सगळ्यांना ही गोड बातमी देऊन त्यांची परवानगी अखेर घेतली. आता ‘जुळता जुळता जुळतंय की’मध्ये अपूर्वा आणि विजयचं शुभमंगल होणार आहे.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर

कोल्हापूरमधील लोकांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या आशिर्वादाने अपूर्वा आणि विजय यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे नवरी मुलीच्या व-हाडीत कोल्हापूरमधील मंडळीदेखील सहभागी होणार आहेत. मुलीची बाजू खंबीर असणं खूप गरजेचं असतं आणि कोल्हापूरकरांनी अगदी योग्य असा निर्णय घेऊन लग्नात सहभागी होण्याचे ठरवले.

मुलीसाठी आणि तिच्या पालकांसाठी लग्नसोहळ्यातील सर्वात जास्त भावनिक गोष्ट म्हणजे ‘कन्यादान’. पण या मालिकेत कन्यादानासारखीच आणखी एक भावूक करणारी गोष्ट म्हणजे अपूर्वाच्या घरातून भाऊ सोडला तर कोणीही या लग्नात उपस्थित नाही, त्यामुळे आपले कन्यादान कोण करणार हा प्रश्न अपूर्वाला सतत सतावत असतो. पण अपूर्वाने तिच्या स्वभावातून विजयच्या घरातील माणसांची मने जिंकली आहेत आणि म्हणूनच विजयचे आजोबा ‘नाना’ अपूर्वाचे कन्यादान करणार आहेत. मुलाकडच्या मंडळीतून कोणी एका व्यक्तीने कन्यादानासाठी पुढाकार घेणे आणि कन्यादानासारखी मोठी जबाबदारी आपलेपणाने पार पाडणे हा एक महत्त्वाचा विचार समाजात पोहचवण्याचे उत्तम कार्य सोनी मराठी आणि या मालिकेने केले आहे. त्याचबरोबर विजय प्रथेप्रमाणे मुलीनेच का वचन द्यायचं असं म्हणून तो पण सात वचनांपैकी काही वचन देणार आहे. ते कुठले वचन असणार हे पाहण्यासाठी मालिकेचा आजचा भाग (२६ डिसेंबरला संध्याकाळी ७ वाजता) पाहावे लागेल.

 

Story img Loader