गायक अदनान सामी मूळचा पाकिस्तानी आहे, पण त्याने भारतीय नागरिकत्व घेतलं आणि तो भारतात राहतो. भारतावर प्रेम असल्याने आपण नागरिकत्व स्वीकारलं असं अदनान म्हणत असतो, पण आता त्याच्या भावाच्या एका दाव्याने मात्र खळबळ उडाली आहे. त्याचा भाऊ जुनैद सामी खानने एक पोस्ट शेअर करत अदनानवर गंभीर आरोप केले आहेत.

जुनैदने एक लांबलचक पोस्ट लिहून भावावर निशाणा साधला आहे. नंतर ही पोस्ट डिलीट झाली असली तरी जुनैदच्या दाव्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, पोस्टमध्ये जुनैदने भाऊ अदनान सामीवर त्याचे करिअर घडवण्यात अजिबात मदत न केल्याचा आरोप केला. जुनैदने पोस्टमध्ये लिहिले “अदनानचा जन्म १५ ऑगस्ट १९६९ रोजी रावळपिंडी येथील रुग्णालयात झाला होता. माझाही जन्म १९७३ मध्ये याच हॉस्पिटलमध्ये झाला. त्यामुळे अदनानचा जन्म इंग्लंड किंवा इतर कोणत्याही ठिकाणी झाल्याचा दावा खोटा आहे.”

PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
marathi Vishwa sammelan Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: “मराठी माणूस कलहशील, त्याला…”, मी पुन्हा येईनची री ओढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खुमासदार भाषण
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Shahid Kapoor Mira Rajput
“तू ‘जब वी मेट’मधील आदित्य सारखा नाही…”; पत्नी मिरा राजपुतची तक्रार, शाहिद कपूर म्हणाला, “आनंदी हो…”
Pankaja Munde on Dhananjay Munde
“धनंजय मुंडे फडणवीस-पवारांचे खास, राजीनामा मागणार नाहीत”, क्षीरसागरांच्या दाव्यावर पंकजा मुंडेंचं दोन वाक्यात उत्तर; म्हणाल्या…
Shahid Kapoor
“जवळच्या गोष्टींचा त्याग…”, ‘देवा’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने केली ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “एक कलाकार म्हणून…”
r madhavan on six pack abs
“माझ्याकडे सिक्स पॅक्स नाहीत, मला डान्सही येत नाही तरीही…”; २५ वर्षे सिनेसृष्टीत काम करणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत

“…म्हणून मी लग्नाला २५ वर्षे होऊनही पतीचं ‘खान’ आडनाव लावलं नाही;” आंतरधर्मीय विवाहाबद्दल प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा

“अदनानला माहीत होते की मी प्रतिभावान आहे आणि गाणे गाऊ शकतो. पण त्याने कधीच माझी काळजी केली नाही. तो स्वार्थी आहे. मला त्याने भारतात कधीच लाँच केले नाही. अदनानला भीती होती की मी त्याच्यापेक्षा चागलं काम करेन. आता मी घरी बसून काही करत नाही. माझ्याकडे काम नाही याला अदनान जबाबदार आहे,” असंही जुनैदने म्ह्टलंय.

“पॉर्न वेबसाईटवर न्यूड फोटो…” प्रसिद्धी अभिनेत्रीला निर्मात्यांकडून धमकीचे मेल, गंभीर आरोप करत म्हणाली “माझं अकाऊंट हॅक…”

जुनैदने भारतीय नागरिकत्वाच्या मुद्द्यावरूही अदनानवर गंभीर आरोप केला आहे. “अदनानने भारताचे नागरिकत्व घेतले कारण त्याला मोबदल्यात चांगले पैसे दिले गेले होते. जे पाकिस्तान देऊ शकला नाही. आपली आई भारतीय होती, असं अदनान म्हणतो, पण त्याचा हा दावाही खोटा आहे. तो कॅनडाच्या तुरुंगातही होता,” असा धक्कादायक खुलासाही जुनैदने केला आहे.

“मस्जिदचा मौलवी वाटतोय…”; देवदत्त नागेच्या ‘आदिपुरुष’मधील लूकवर टीका करणाऱ्याला प्रसिद्ध मराठी अभिनेता सडेतोड उत्तर देत म्हणाला, “काही चुकीचे…”

जुनैदने आपल्या भावाच्या वैयक्तिक आयुष्यावरही लिहिले आहे. अदनानने त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या पॉर्न डीव्हीडी बनवल्याचा त्याचा दावा आहे. “या गोष्टीचा मला त्रास झाला. मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत असं कधीच करू शकणार नाही. त्याने २००७-०८ मध्ये दुसरी पत्नी सबा गलादेरीच्या पॉर्न डीव्हीडी बनवल्या. पती-पत्नीमधील गोष्टी फक्त आपापसातच ठेवल्या जातात. अदनानने या डीव्हीडी कोर्टाला दिल्या होत्या. हे व्हिडीओ सबाच्या बॉयफ्रेंडने बनवल्याचा दावा अदनानने कोर्टात केला होता, पण ते सगळं खोटं आहे,” असं जुनैदने म्हटलं आहे. दरम्यान, जुनैदच्या या आरोपांवर अदनान सामीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Story img Loader