एखादा चित्रपट करायचा म्हटला की ऑन स्क्रिन जेवढ्या गमती प्रेक्षकांसमोर येतात त्या आड कितीतरी मजेदार किस्से त्याला जोडलेले असतात. एखादा विनोदी चित्रपट पाहताना जितके हास्य आपल्या चेहऱ्यावर खुलते त्याहून कितीतरी पट जास्त विनोद त्याच्या चित्रिकरणादरम्यान होत असतात. या चित्रिकरणादरम्यानच्या गमती, मजा, धमाल, मस्ती सगळच आगळवेगळ असतं.
अशाच काही गमती-जमतींचा अनुभव घेत ‘पोश्टर गर्ल’ सिनेमाचे चित्रिकरण पार पडले. यादरम्यान बरेच किस्से घडले. बरीच लाडाची नावे एकमेकांना देण्यात आली. यात बाजी मारली ती वायकॉम18 मोशन पिक्चर्सच्या ‘पोश्टर गर्ल’ने. चित्रपटात पोश्टर गर्लची प्रमुख भूमिका साकारत असलेल्या सोनालीने या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान बरीच नावे कमावली आहेत. याविषयी हेमंत ढोमेला विचारले असता त्याने कमरूद्दीन बक्षी हे सोनालीचे गाजलेले नाव असल्याचे सांगितले. त्याशिवाय कोणी तिला सोना म्हटले तर कोणी शोन्स, कोणासाठी ती सोनी होती तर कोणासाठी होती सोनपरी. चित्रपटाचे दिगदर्शक तर चक्क तिला मॅडम म्हणायचे.
चित्रिकरणादरम्यान ती एकुलती एक मुलगी असल्याने तिचे खूप लाड झाल्याचे सोनालीने म्हटले आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या नावांनी तिला हाक मारत होते. अशा ह्या पोश्टर गर्ल चित्रिकरणादरम्यान सोनालीच्या लाडाच्या नावांमध्ये बरीच भर पडली आहे. तर असा हा सोनालीला नावांची श्रीमंती बहाल करणारा पोश्टर गर्ल येत्या १२ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा