सध्या सोशल मीडियावर ज्युरासिक वर्ल्ड : डॉमिनियन या चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा सुरु आहे. ज्युरासिक वर्ल्डच्या सीरिजचा हा तिसरा आणि ज्युरासिक पार्क फ्रँचाईझीमधला सहावा चित्रपट आहे. हा चित्रपट १० जून २०२२ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा ३ मिनिटांचं चित्रपटाचा ट्रेलर आहे. यात डायनॉसर मुक्तपणे फिरताना दिसतात. यात मनुष्य आणि डायनॉसर एकत्र दिसत आहेत. सुटका झाल्यानंतर डायनॉसर्स आता जगभरात मानवांबरोबरच शिकार करत असतात. त्यांच्यात असलेला समतोल भविष्याचा आकार ठरवेल आणि परत एकदा मानवच पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ ठरेल की या सर्वात भीतीदायक प्राण्याचं वर्चस्व असेल हे या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात

खिळवून ठेवणाऱ्या या ट्रेलरमध्ये धाडसी आणि थरारक ज्युरासिक वर्ल्डचा आत्मा पुरेपूर उतरल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी पहिल्याच सीनपासून हा ट्रेलर आपल्याला खिळवूण ठेवणार आहे. यात डायनॉसॉर्सचा आकार आणखी मोठा आणि भयानक झाल्याचे दाखवण्यात आले आहे. अलन ग्रँट आणि एली सॅटलर यांच्यातील सीन्स या फ्रँचाईझीच्या चाहत्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेले डायनॉसॉर्स आणि मानवातील पाठलागाचे सीन्स प्रत्येकाचीच या सिनेमाची उत्सुकता वाढवणारे ठरत आहेत.

आणखी वाचा : पाकिस्तानी गायकाने दुबईत लतादीदींना वाहिली श्रद्धांजली, व्हिडीओ पाहून नेटकरी करतायत स्तुती

आणखी वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मध्ये जेसिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

ख्रिस पॅट आणि ब्रायस डलास हॉवर्ड हे या चित्रपटात आपल्याला दिसणार आहेत. त्याशिवाय डॉमिनियनमध्ये सॅम नील डॉ. अलन ग्रँट आणि लॉरा डर्न डॉ. एली सॅटलर यांच्या भूमिकेत तर जेफ गोल्डब्लम डॉ. इयन मॅल्कॉमच्या भूमिकेत परत दिसणार आहेत. ज्युरासिक पार्क डॉमिनियन १० जून रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.