मुंबईच्या रस्त्यावर भर दुपारी ऐन गर्दीच्यावेळी सुपरहिरो ‘क्रिश’चा मास्क घालून रणवीरने बिनधास्तपणे थिरकण्याची अजब करामत करुन मुंबईकरांना आश्चर्यचकित केले. अचानक रस्त्यावर येऊन नृत्य करण्याच्या रणवीरच्या या करामतीमागे अभिनेता ऋतिक रोशनचा हात आहे.
होय, ऋतिक रोशन सध्या आपल्या आगामी ‘बँग बँग’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नवी शक्कल लढवून बॉलीवूडकरांना वेगवेगळे कर्तब करण्याचे आव्हान देत आहे. यात ‘राम लीला’ फेम रणवीर सिंग याला देखील ऋतिकने अनोखे ‘बँग बँग’ आव्हान दिले होते. ‘क्रिश’ चित्रपटातील लूकमध्ये मुंबईतील एखाद्या वर्दळीच्या ठिकाणी जाऊन नृत्य करण्याचे ऋतिकचे आव्हान रणवीरने लिलया पेलले.
यामध्ये रणवीर आपल्या कारमधून बाहेर पडून काही मिनिटे ‘मैं ऐसा क्यू हूं’ या ऋतिकच्याच गाण्यावर बिनधास्तपणे नृत्य करताना दिसला. इतकेच नाही, तर यावेळी त्याने तेथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचा-यासमोर कान पकडून माफीसुद्धा मागितली. अखेरीस चेहऱयावरली क्रिशचा मास्क काढल्यानंतर नागरिकांना रणवीरची ओळख पटण्यास सुरूवात होते न होते तोवर रणवीर त्वरित आपल्या कारमध्ये बसून गमतीशीरपणे पसार देखील झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा