आंतरराष्ट्रीय पॉप गायक जस्टिन बिबरने अभिनेत्री, गायिका सेलेना गोमेजसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही काळातच त्याचं अमेरिकन मॉडेल हेली बाल्डविनशी (Hailey Baldwin) सूत जुळलं. विशेष म्हणजे या दोघांनी गुपचूप लग्न केल्याचं स्पष्ट झालं आहे.
काही दिवसापूर्वी जस्टिनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत हेली बाल्डविनशी लग्न केल्याचं जाहीर केलं होतं. या पोस्टमध्ये त्याने हेलीसोबतचा फोटो शेअर करत ‘माय वाईफ इज ऑसम’ असं कॅप्शन दिलं होतं. त्यामुळे जस्टिनने लग्न केल्याचं सर्वांसमक्ष जाहीर केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता हेलीनेदेखील सोशल मीडियावर जस्टिनसोबत लग्न केल्याचं स्पष्ट केलं आहे. हेलीने इन्स्टावर तिच्या नावात बदल केला आहे.
हेलीने इन्स्टाग्रावर हेली बाल्डविनच्याऐवजी आता हेली ‘बिबर’ असं नाव केलं आहे. विशेष म्हणजे या दोघांनी साखरपुडा केल्यानंतर चाहत्यांना त्यांच्या लग्नाविषयी प्रचंड उत्सुकता होता. मात्र या दोघांनी कोणताही गाजावाज न करता लग्न केल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, आपल्या गाण्यांनी अनेक तरुणींची मनं जिंकणारा जस्टिनने बहामा आयलँडवर जस्टिनने हॅलेला लग्नाची मागणी घातली होते. त्यावेळी हॅलेने तात्काळ जस्टिनला होकारही दिला होता. तेव्हापासून ही जोडी सतत या ना त्या कारणाने चर्चेत येत आहे.