जगप्रसिद्ध पॉप गायक जस्टिन बीबरने ख्रिसमसच्या दिवशी आपल्या चाहत्यांना एका ट्विटने निराश केले. आता आपण अधिकृतरित्या गायनातून निवृत्ती घेत असल्याचे जस्टिन बीबरने सांगितले आहे.
जस्टिन सध्या केवळ १९ वर्षांचा आहे आणि त्याने अशा अचानक जाहीर केलेल्या निवृत्तीमुळे बीबर चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
ज्यावयात करिअरलाही सुरूवात होत नाही त्यावयात जस्टिनने निवृत्तीची घोषणा केली आहे. परंतु, जस्टिनने अधिकृत निवृत्ती घेत असल्याचे ट्विट केल्यानंतर त्यापुढील ट्विट विरोधाभास निर्माण करणारे आहे. त्यामुळे सर्वांच्या मनात शंकांचे वादळ निर्माण झाले आहे. जस्टिन आपल्या दुसऱया ट्विटमध्ये म्हणतो, “माध्यमांमध्ये माझी सध्या जास्त चर्चा होत आहे. त्यात अनेक असत्य गोष्टीही आहेत आणि त्यांना मी तुमच्यापासून (चाहत्यांपासून) दूर जावेसे वाटत आहे परंतु, चिंता करू नका मी तुम्हाला कधीच सोडणार नाही.” असेही जस्टिनने म्हटले आहे.
जस्टिन बीबरने २००८ साली आपल्या गायनाला सुरूवात केली होती. बीबर फक्त गायक नसून तो स्वत: गाण्यांना संगीत देतो आणि गाणी लिहीतोही. जस्टिनच्या सर्व गाण्यांनी तरुणांना भुरळ घातली आहे.
‘जस्टिन बीबर’ची अवघ्या १९व्या वर्षी गायनातून निवृत्ती!
जगप्रसिद्ध पॉप गायक जस्टिन बीबरने ख्रिसमसच्या दिवशी आपल्या चाहत्यांना एका ट्विटने निराश केले. आता आपण अधिकृतरित्या गायनातून निवृत्ती घेत असल्याचे जस्टिन बीबरने सांगितले आहे.
First published on: 26-12-2013 at 12:06 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Justin bieber announces he is officially retiring