रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानींच्या घरी सध्या लाडक्या लेकाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्य विवाहसोहळा येत्या १२ जुलैला पार पडणार आहे. यापूर्वी दोघांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झालेली आहे. नुकताच अंबानींच्या घरी ‘मामेरु’ समारंभ साजरा करण्यात आला. यानंतर आता सर्वांना अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याची उत्सुकता लागली आहे. या सोहळ्यासाठी खास जस्टिन बिबर भारतात आला आहे.

शुक्रवारी सकाळी मुंबईत विमानतळावर जस्टिन बिबरने एन्ट्री घेताच त्याच्या सगळ्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं. गुलाबी रंगाचा टी-शर्ट, डोक्यावर लाल टोपी अशा हटके लूकमध्ये जस्टिन दिसला. यापूर्वी २०१७ मध्ये तो भारतात आला होता. आता अंबानींच्या घरातील संगीत सोहळ्यासाठी तब्बल ७ वर्षांनी हा प्रसिद्ध हॉलीवूड गायक पुन्हा एकदा भारतात दाखल झाला आहे. याचा व्हिडीओ ‘मानव मंगलानी’ या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ

हेही वाचा : Video: “हार्दिकने माझ्याकडे बघून…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याला विश्वविजेत्या भारतीय संघाचा आला अविस्मरणीय अनुभव, म्हणाला…

अनंत-राधिकाचा संगीत सोहळा ५ जुलैला रात्री पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अंबानी कुटुंबीय खास तयारी करत आहेत. हिंदुस्तान टाइम्सने लिओडियासद्वारे दिलेल्या वृत्तानुसार, जस्टिन बिबर ‘सेलिब्रेशन ऑफ हार्ट्स’ म्हणजेच अंबानींच्या संगीत समारंभात काही तासांचा परफॉर्मन्स सादर करण्यासाठी तब्बल १० दशलक्ष डॉलर म्हणजे ८३ कोटी रुपये इतकं मानधन घेणार आहे. जस्टिनचं मानधन ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, रिहानापेक्षा जास्त मानधन या हॉलीवूड गायकाने आकारलं आहे.

हेही वाचा : Video : ‘झलक दिखला जा ११’ची विजेती मनीषा रानीने वडिलांचं दुसरं स्वप्न केलं पूर्ण, हक्काचं घर बांधल्यानंतर दिली लाखो रुपयांची भेटवस्तू

हेही वाचा : “खरंतर हे मागच्या वर्षीच अपेक्षित होतं…”, विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाची विजयी मिरवणूक पाहून जितेंद्र जोशीची प्रतिक्रिया

दरम्यान, अनंत – राधिकाच्या संगीत सोहळ्यासाठी आज अंबानींच्या घरी भव्य तयारी करण्यात येणार आहे. यापूर्वी जामनगरमध्ये झालेल्या प्री-वेडिंग कार्यक्रमाला हॉलीवूड गायिका रिहानासह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. पुढच्या आठवड्यात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न पारंपारिक हिंदू पद्धतीनुसार होणार आहे. हे जोडपं १२ जुलै रोजी लग्नगाठ बांधेल. लग्नाच्या दिवशी, पाहुण्यांसाठी खास पारंपरिक थीम ठेवण्यात आली आहे. राधिका मर्चंटबद्दल सांगायचं झालं, तर ती एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट आणि उद्योजक शैला मर्चंट यांची मुलगी आहे.

Story img Loader