पॉप गायक जस्टिन बिबरने पाकिस्तानी सामाजिक कार्यकर्ती मलाला युसूफझईबरोबर फेसटाईमवरून संवाद साधला आणि आपल्या या नव्या मैत्रिणीबरोबर संवाद साधतानाचे छायाचित्र लगेचच सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. या प्रसिद्ध कॅनेडियन गायकाने शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या १७ वर्षीय मलालाबरोबरचे व्हिडिओ-संवादाचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केल्याचे ‘एस शोबिझ’च्या वृत्तात म्हटले आहे. या छायाचित्राबरोबरच्या संदेशात तो म्हणतो, मलालाबरोबरच्या फेसटाईमवरील संवादासाठी मी कमालीचा उत्सुक आहे. अतिशय प्रेरणादायी अशी तिची कहाणी आहे. तिला प्रत्यक्ष भेटण्यासाठीदेखील मी तितकाच उत्सुक असून, तिला आणि मलालाफंड @malalafund या तिच्या निधीला मी कशाप्रकारे मदत करू शकतो, हे तिच्याकडून जाणून घ्यायचे आहे. पाकिस्तानात मुलींच्या शैक्षणिक अधिकारासाठी आवाज उठविल्याने मलालाच्या डोक्यात गोळी मारण्यात आली होती. २०१२ सालच्या या घटनेनंतर ती प्रकाशझोतात आली. जिवाला धोका असतानादेखील न घाबरता तिने आपले सामाजिक कार्य सुरू ठेवले. आपल्या विचित्र वागणुकीसाठी सतत चर्चेत असणारा पॉप गायक जस्टिन बिबरदेखील ‘मेक-अ-विश’ या सामाजिक संस्थेला सहाय्य करत असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा