अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. या भव्य लग्नसोहळ्यात अनेक कार्यक्रम पार पडणार आहेत. त्यात समाविष्ट असलेल्या कार्यक्रमांमधीलच एक म्हणजे नुकताच पालघर येथे पार पडलेला सामूहिक विवाह सोहळा. तसेच ३ जुलैला मुंबईतील अंबानी निवासात ‘मामेरू’ हा कार्यक्रम पार पडला. हळूहळू विधींना सुरुवात झाली आहे आणि अनेक प्रसिद्ध मंडळी या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतायत.

आता जगप्रसिद्ध गायक, पॉपस्टार जस्टिन बीबर भारतात आला आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात जस्टिनचा परफॉर्मनस होणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी (५ जुलै) पार पडणार आहे. शुक्रवारी मुंबई विमानतळावर पापाराझींनी जस्टिन बीबरचे फोटो आणि व्हिडीओ काढले; जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जस्टिन बीबर सात वर्षांनंतर भारतात परतला आहे. पण, यावेळी जस्टिन फक्त अंबानी आणि त्यांच्या पाहुण्यांसाठी परफॉर्म करणार आहे. जस्टिन या परफॉर्मन्ससाठी ८३ कोटींचे मानधन घेणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. जस्टिनने २०२२ वेळी भारतात एका कॉन्सर्टची घोषणा केली होती; परंतु नंतर त्याची प्रकृती खालावल्याने त्याने हे कॉन्सर्ट रद्द केले होते.

हेही वाचा… हिना खानने केस कापताच अभिनेत्रीच्या आईचे अश्रू अनावर, कर्करोगाचं निदान होताच घेतला मोठा निर्णय; म्हणाली, “मला हा मानसिक त्रास…”

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा संगीत सोहळा शुक्रवार, ५ जुलै रोजी मुंबईत त्यांच्या भव्य निवासस्थानी अँटिलिया येथे पार पडणार आहे. तर, १२ जुलै रोजी हे जोडपे लग्नबंधनात अडकणार आहे.

१ मार्च ते ३ मार्चदरम्यान अनंत-राधिकाचा पहिला प्री-वेडिंग सोहळा भव्य स्वरूपात पार पडला. गुजरात येथील जामनगर येथे पार पडलेल्या या सोहळ्याला जगभरातील अनेक प्रसिद्ध आणि नामवंत मंडळींनी हजेरी लावली होती. बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, जगप्रसिद्ध गायिका रिहानापासून ते बॉलीवूड आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक जण या सोहळ्याला उपस्थित होते.

हेही वाचा… “तो तुम्हाला कधीही सोडणार…”, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान हार्दिक पंड्याची पत्नी नताशाने शेअर केला ‘हा’ व्हिडीओ, म्हणाली…

तसेच २९ मे ते १ जून रोजी अनंत-राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा इटली येथे पार पडला. या सोहळ्यात अंबानी, मर्चंट कुटुंबासह सलमान खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर, आलिया भट्ट अशा अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आता लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असून, जगप्रसिद्ध आणि नामवंत मंडळी या भव्य सोहळ्यात आपली उपस्थिती दर्शवीत आहेत.