सुप्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बीबरने सोशल मीडियाद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधील जस्टिनची अवस्था पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. जस्टिन सध्या रामसे हंट सिंड्रोम (Ramsay Hunt Syndrome) नावाच्या आजाराशी झुंज देत आहे. या आजारामुळे त्याच्या चेहऱ्याची विचित्र अवस्था झाली आहे. यामुळे चेहऱ्याचा पॅरेलिसिस (अर्धांगवायू) या समस्येचा त्याला सामना करावा लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – सुपरस्टार प्रभास लवकरच विवाहबंधनात अडकणार?, लग्नासाठी मुलगीही तयार पण मुहूर्त कधी?

जस्टिनने व्हिडीओ शेअर करत आपल्या आजाराबाबत माहिती दिली आहे. “तुम्ही पाहू शकता की डोळे मिचकावणं माझ्यासाठी कठीण झालं आहे. मी नीट हासू देखील शकत नाही. माझ्या चेहऱ्याचा एक भाग पूर्ण पॅरेलिसिस आहे. हा एक गंभीर आजार आहे. म्हणूनच मी माझे पुढीस सगळे शो रद्द केले आहेत. माझे पुढील शो रद्द झाल्याने काही लोकं निराश असतील. त्यांना एवढंच सांगू इच्छितो की शोसाठी शारिरीकरित्या मला उपस्थित राहणं शक्य नाही.”

रामसे हंट सिंड्रोम म्हणजे नक्की काय? हे देखील जस्टिनने व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं आहे. सध्या या आजारामधून कसं बरं होता येईल? यासाठी तो प्रयत्न करत आहे. या आजारामधून बाहेर पडण्यासाठी जस्टिन शक्य तेवढे प्रयत्न करतोय. तसेच चेहऱ्याचा व्यायाम मी नियमित करत असल्याचं देखील जस्टिनने सांगितलं आहे.

आणखी वाचा – ‘सम्राट पृथ्वीराज’च्या अपयशानंतरही अक्षयची गाडी सुसाट, निर्मात्याचं मात्र १०० कोटींपेक्षा अधिक नुकसान

इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे व्हिडीओ शेअर करताना जस्टिनने खास कॅप्शन दिलं आहे. “अवश्य हा व्हिडीओ पाहा. मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो आणि तुम्ही मला कायम लक्षात ठेवा.” जस्टिनची ही अशी अवस्था पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच जस्टिन लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Justin bieber says hes working to recover from partial face paralysis ramsay hunt syndrome video viral on social media kmd