अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा संगीत सोहळा ५ जुलै रोजी पार पडला. या संगीत सोहळ्याला बॉलीवूड, तसेच क्रीडा क्षेत्रातील मंडळींसह विविध क्षेत्रांतील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. तसेच जगप्रसिद्ध गायक जस्टिन बीबरनं या संगीत सोहळ्यात खास परफॉर्मन्स केला होता. जस्टिनच्या या परफॉर्मन्सचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यातील या खास परफॉर्मन्ससाठी जस्टिननं १० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच ८३ कोटी रुपये इतकं मानधन घेतलं होतं. या परफॉर्मन्समध्ये जस्टिननं सफेद रंगाची सँडो (बनियन), काळी बेसबॉल कॅप, काळ्या रंगाची पॅन्ट व शॉर्ट्स असा वेश परिधान केला होता. “इतकं मानधन घेऊनही जस्टिननं बनियन घालून परफॉर्मन्स केला”, असं म्हणत सोशल मीडियावर नेटकरी आता त्याला ट्रोल करीत आहेत.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ

हेही वाचा… गुडन्यूज दिल्यानंतर ‘या’ प्रसिद्ध फॅशन डिझायनरने पहिल्यांदाच शेअर केले बेबी बंपचे फोटो; म्हणाली, “अजूनही थोडं…”

एक्स अकाउंटवर जस्टिनचा फोटो शेअर करीत एका युजरनं लिहिलं, “जस्टिन बीबरला अनंत अंबानीच्या संगीत सोहळ्यात त्याचं अंतर्वस्त्र दाखविण्यासाठी १० दशलक्ष डॉलर्स मिळतात. काही लोकांचं नशीब खरंच छान असतं.” दुसऱ्या युजरनं पोस्ट करीत लिहिलं, “ही ५० रुपयांची शॉर्ट्स आहे.” एकानं “अनंत अंबानीच्या संगीत सोहळ्यात जस्टिन बीबरनं रामराज बनियन घातली होती”, अशी पोस्ट एक्स अकाउंटवर केली.

इन्स्टाग्रामवरदेखील जस्टिनचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानं नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत प्रतिक्रिया दिली आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “त्याला पॅन्ट कशी घालायची हेदेखील माहीत नाही.” दुसऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “१५० रुपयांची बनियन घालून ८३ कोटींचा चुना लावला.” जस्टिनच्या या लूकसाठी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय.

शुक्रवारी मुंबईतील नीता मुकेश अंबानी कन्व्हेन्शनल सेंटर येथे पार पडलेल्या संगीत सोहळ्यात जस्टिन बीबरनं ‘बेबी’, ‘पीचेस’, ‘लव्ह युअरसेल्फ’ व ‘सॉरी’ यांसारखी हिट गाणी सादर केली. बॉलीवूडमधले अनेक कलाकार या गाण्यावर मंत्रमुग्ध होऊन थिरकताना दिसले.

हेही वाचा… “माझ्या अंगावरचे डाग…”, कर्करोगाशी सामना करणाऱ्या हिना खानचा चाहत्यांना प्रश्न, म्हणाली…

दरम्यान, जस्टिन बीबर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यासाठी तब्बल सात वर्षांनंतर भारतात परतला. जस्टिननं २०२२ रोजी भारतात एका कॉन्सर्टची घोषणा केली होती; परंतु नंतर त्याची प्रकृती खालावल्यानं त्यानं हे कॉन्सर्ट रद्द केलं होतं.

Story img Loader