ज्योतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात ज्योतिबा मंदिराचा परिसर दरवर्षी भक्तांनी फुलून जातो. सासनकाठीचं पूजन, गुलाल आणि खोबऱ्याची होणारी उधळण आणि श्रींचा पालखी सोहळा हे नयनरम्य दृष्य दरवर्षी पाहायला मिळतं. करोनाच्या संकटामुळे यंदा हे चित्र पाहायला मिळालं नाही. पण स्टार प्रवाह वतीने यंदा ज्योतिबा मंदिर आणि रंकाळा तलाव परिसर गुलाबी रंगात न्हाऊन निघाला. यंदा गुलालाची उधळण करणं शक्य नसलं तरी विद्युत रोषणाईच्या माध्यमातून मंदिरावर गुलाबी रंगाची बरसात झाली. यासोबतच रंकाळा तलावही गुलाबी रंगात न्हाऊन निघाला होता. सरकारी सूचनांचं काटेकोरपणे पालन करत ही नयनरम्य रोषणाई करण्यात आली. डोळ्याचं पारणं फेडणारी ही रोषणाई कोल्हापूर नगरीच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकत होती.

local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
Important research Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University shows that mosquitoes are repelled by yellow light of LED
डासांपासून त्रस्त झाले का? हे करून बघा, काय सांगते पिवळ्या दिव्याचे नवे संशोधन
Western Railway service disrupted mumbaiu print news
पश्चिम रेल्वेची सेवा खोळंबली
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!

करोनाच्या या संकटकाळात गेल्या सात महिन्यांहून अधिक काळ भक्तांना ज्योतिबाच्या मंदिरात जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेता आलेलं नाही. मात्र लाडक्या दैवताच्या भेटीची भक्तांची ही आस लवकरच पूर्ण होणार आहे. स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या पौराणिक मालिकेच्या रुपात प्रेक्षकांना घरबसल्या ज्योतिबाचं दर्शन होणार आहे. स्टार प्रवाह वाहिनी आणि कोठारे व्हिजन्सने हे नवं आव्हान स्वीकारलं असून ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका २३ ऑक्टोबरपासून सायंकाळी ६.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.