ज्योतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात ज्योतिबा मंदिराचा परिसर दरवर्षी भक्तांनी फुलून जातो. सासनकाठीचं पूजन, गुलाल आणि खोबऱ्याची होणारी उधळण आणि श्रींचा पालखी सोहळा हे नयनरम्य दृष्य दरवर्षी पाहायला मिळतं. करोनाच्या संकटामुळे यंदा हे चित्र पाहायला मिळालं नाही. पण स्टार प्रवाह वतीने यंदा ज्योतिबा मंदिर आणि रंकाळा तलाव परिसर गुलाबी रंगात न्हाऊन निघाला. यंदा गुलालाची उधळण करणं शक्य नसलं तरी विद्युत रोषणाईच्या माध्यमातून मंदिरावर गुलाबी रंगाची बरसात झाली. यासोबतच रंकाळा तलावही गुलाबी रंगात न्हाऊन निघाला होता. सरकारी सूचनांचं काटेकोरपणे पालन करत ही नयनरम्य रोषणाई करण्यात आली. डोळ्याचं पारणं फेडणारी ही रोषणाई कोल्हापूर नगरीच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकत होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in