तेलुगू चित्रपटसृष्टीतील महान दिग्दर्शक कासिनाथनि विश्वनाथ म्हणजेच के विश्वनाथ यांचे गुरुवारी २ फेब्रुवारीला निधन झाले. त्यांच्या निधनाला २४ दिवस उलटल्यानंतर आता त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. के विश्वनाथ यांच्या निधनानंतर जवळपास एक महिन्यांनी पत्नी जयलक्ष्मी यांनीही जगाचा निरोप घेतला आहे. जयलक्ष्मी यांचे (२६ फेब्रुवारी) वृद्धपकाळाने निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

के विश्वनाथ यांच्या पत्नी जयलक्ष्मी या गेल्या कित्येक वर्षांपासून आजारी होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांची प्राणज्योत मालवली.
आणखी वाचा : K Viswanath: ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्राप्त तेलगू दिग्दर्शक के. विश्वनाथ यांचे निधन

सध्या सोशल मीडियावर अभिनेता पवन कल्याण आणि चिरंजीवी यांचा एक फोटो व्हायरल होत आहेत. यात ते दोघेही जयलक्ष्मी यांना भेटायला गेल्याचे पाहायला मिळत आहे. जयलक्ष्मी यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे.

आणखी वाचा : Video : “मला भीती वाटत होती, पण केवळ त्यांच्यामुळे…” वीणा जगतापने सांगितला ‘तो’ किस्सा

दरम्यान जयलक्ष्मी यांचे पती महान तेलगू दिग्दर्शक के. विश्वनाथ यांचे गुरुवारी २ फेब्रुवारीला निधन झाले. त्या वयोमानाशी संबंधित आजार होते. त्यामुळे ते त्रस्त होते. त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरू होते.२०१७ मध्ये त्यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देऊन भारत सरकारने सन्मानित केलं होतं. त्यांना कला तपस्वी म्हणूनही ओळखलं जात होतं. ते तेलगू दिग्दर्शक असले, तरी त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही तेवढीच मोठी भूमिका पार पाडली होती.

तेलुगू दिग्दर्शक के. विश्वनाथ यांच्या पत्नी जयलक्ष्मी या कुरनूल जिल्ह्यातील रहिवाशी होत्या. त्यांचे वडील स्टेशन मास्तर म्हणून काम करत होते. त्यांना २ मुलं आणि १ मुलगी असून त्यांचे लग्न झाले आहे. त्यांना ६ नातवंड आहेत.