झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ आणि ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकांनंतर आता आणखी एक लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे घराघरात पोहचलेले जय आणि आदिती यांची प्रेमकहाणी येत्या २६ मार्चला सुफळ संपूर्ण (?) होणार आहे. या जागी आता ‘काहे पिया परदेस’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २८ मार्चपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता ही नवी मालिका प्रक्षेपित होणार आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच मराठी मालिकेत मराठी आणि हिंदी संस्कृतीचा मिलाफ दिसून येणार आहे.
‘का रे दुरावा’ या मालिकेने जवळपास गेली सव्वा वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. ऑफिसमध्ये असणाऱ्या विचित्र नियमामुळे एका विवाहित जोडप्याची होणारी कुचंबणा, तारांबळ आणि या सगळ्यातून निर्माण झालेल्या रंजक परिस्थितीचे ‘का रे दुरावा’ मध्ये प्रभावीपणे करण्यात आले होते. या अनोख्या संकल्पनेमुळे ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा