अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर उर्वशी सोशल मीडियावर बरीच ट्रोल झाली होती. तिच्या पोस्टवर कमेंट्स करत युजर्सनी तिला खूप सुनावलंही होतं. नुकतीच तिने कांतारा फेम अभिनेता रिषभ शेट्टीची भेट घेतली होती. यावरून कांतारा २ मध्ये ती दिसणार अशी चर्चा माध्यमात होती आता यावरच रिषभ शेट्टीने भाष्य केलं आहे.
अभिनेता रिषभ शेट्टी कांतारा चित्रपटामुळे आता प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. देशातच नव्हे तर जगभरात त्याचे नाव झाले आहे. रिषभकडे सध्या अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आहेत. काही दिवसांपूर्वी या दोघांची भेट झाली होती उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दोघांचा फोटो शेअर केला आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले. मात्र आता यावर रिषभ शेट्टीने बॉलिवूड इन्स्टंटशी बोलताना म्हणाला, “नाही असं अजिबात नाही एका सेल्फीवरून तुम्हाला असे वाटले मात्र सध्या मी लिहत आहे मग घोषणा करेन.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
कॅनडाच्या नागरिकत्वावरून होणाऱ्या टीकेवर अक्षय कुमारने सोडलं मौन; म्हणाला…
दाक्षिणात्य स्टार रजनीकांत या चित्रपटात झळकणार अशी चर्चा होती मात्र याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या चित्रपटाची ज्यांनी निर्मिती केली आहे त्या होम्बाळे प्रॉडक्शनने काही दिवसांपूर्वी घोषणा केली की ‘कांतारा’ चित्रपटाचा प्रीक्वल येणार आहे रिषभ शेट्टीने यावर काम सुरु केलं आहे.
‘कांतारा’ हा फक्त १६ कोटीच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट आहे, पण याला मिळालेलं यश आणि प्रेक्षकांच्या प्रतिसाद बघता याच्या प्रीक्वलसाठी जास्त बजेटसह हा चित्रपट आणखी भव्य पद्धतीने सादर करणार असल्याची चर्चा होत आहे. रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ने बॉक्स ऑफिसवर ४५० कोटी एवढी कमाई केली. आता पुढील वर्षी येणाऱ्या ‘कांतारा २’साठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.