बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले अभिनेते कबीर बेदी हे नेहमी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यमुळे चर्चेत असतात. नुकतंच कबीर बेदी यांच्या जीवनकथेवर आधारित असलेले आत्मचरित्र ‘स्टोरीज आय मस्ट टेल: द इमोशनल लाईफ ऑफ द अॅक्टर’ हे प्रकाशित झाले. यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दलचा खुलासा केला आहे.
कबीर बेदी यांच्या या आत्मचरित्रामध्ये पहिली पत्नी प्रोतिमा बेदी असो किंवा गर्लफ्रेंड परवीन बाबी यांच्याबद्दल अनेक गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत. कबीर बेदी यांचे वैयक्तिक आयुष्य आणि प्रेमकथा कोणापासूनही लपून राहिलेल्या नाहीत. कबीर बेदींनी चार विवाह केले होते. मात्र, हे नाते फार काळ टिकले नाही. परवीन बाबीसाठी त्याने आपल्या पहिल्या पत्नीशी संबंध तोडले. मात्र परवीन बाबी आणि त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही.
पण योगायोग म्हणजे कबीर बेदी यांच्या चौथ्या आणि सध्याच्या पत्नीचे नाव हे परवीन असे आहे. ती त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहे. त्या दोघांच्या वयात २९ वर्षांचे अंतर आहे. नुकतंच प्रकाशित झालेल्या या आत्मचरित्रामध्ये त्यांनी आताची पत्नी परवीनबद्दल खुलासा केला आहे.
त्यांच्या आत्मचरित्रात लिहिल्या माहितीनुसार, त्याला त्याची सध्याची पत्नी परवीन दोसांझ हिचे नाव बदलायचे होते. मी याबाबत माझ्या पत्नीलाही सांगितले होते. कारण हे नाव त्याच्या आयुष्यात आधीच जोडले गेले होते. कबीर यांची ही मागणी ऐकल्यानंतर परवीना प्रचंड राग आला होता. पण नंतर तिला सर्व सत्यकथा समजली. त्यानंतर आता कबीर तिला ‘वी’ या नावाने आवाज देतात.
कबीर बेदी यांनी त्यांच्या पुस्तकात परवीन बाबी यांची भेट कशी झाली याचाही उल्लेख केला आहे. एकदा माझी पत्नी उडिया शिकण्यासाठी गेली होती. त्यावेळी माझी आणि बॉलिवूड अभिनेत्री परवीन बाबीची भेट झाली. आम्ही दोघेही पहिल्या नजरेतच एकमेकांच्या प्रेमात पडलो. त्यानंतर काही महिन्यांनी पत्नी प्रोतिमा आणि त्यांचे लग्न मोडले होते. कबीर बेदी यांना सिनेसृष्टीत प्ले बॉय या नावाने ओळखायचे.