लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने २५ जून १९८३ रोजी विश्वचषक जिंकत इतिहास रचला होता. याच विजयगाथेवर आधारित ‘83’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘83’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने सर्वजण याची उत्सुकतेने वाट पाहताना दिसत आहेत.
नुकतंच ‘83’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चित्रपटातील कलाकारांची निवड, त्यांच्यासोबतचे शूटींग, त्यातील आव्हाने याबाबतचे अनेक खुलासे केले आहेत. यावेळी त्यांना चित्रपटात दिग्गज कलाकारांच्या निवडीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, “मला या चित्रपटात पहिल्या व्यक्तीपासून शेवटच्या व्यक्तीला निवडेपर्यंत तब्बल १८-२० महिने लागले.”
“या सर्वांमध्ये काही तरी शारिरिक साम्य असणे गरजेचे होते. तसेच त्यांना हा खेळ कसा खेळायचा आहे, याचीही माहिती असणे आवश्यक होते. त्यामुळे त्या सर्वांना आधी मैदानात आणि नंतर ऑडिशनमध्ये पास व्हावे लागले. यानंतरही पुढे दोन महिने त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी गेले. त्यामुळे चित्रपटातील कलाकारांचे कास्टिंग करणे ही हे मोठी प्रक्रिया ठरली,” असे कबीर खान यांनी सांगितले.
दरम्यान नुकतंच या चित्रपटाचा एक प्रीमियर शो आयोजित करण्यात आला होता. या प्रीमियर शो ला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. मात्र यात कुठेही कपिल देव यांचा विश्वचषक विजेता भारतीय संघ पाहायला मिळाला नाही. याबाबत कबीर खान यांना विचारले असता ते म्हणाले, “कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण त्यातील एकानेही अद्याप हा चित्रपट पाहिलेला नाही.”
“मला चित्रपटात…”, 83′ पाहिल्यानंतर सुनिल शेट्टीची धक्कादायक प्रतिक्रिया
“कपिल देव यांनी आम्हाला सांगितले की, ‘83’ चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर आम्ही संपूर्ण टीम म्हणून एकत्र बसून तो पाहू. त्यापूर्वी आम्ही कोणतीही स्क्रीनिंग पाहणार नाही. यामुळे ते प्रसिद्धीपासून फार दूर असल्याचे पाहायला मिळते. कपिल देव यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास मी फार खूश आहे. त्यांनी त्यांची आणि टीमची संपूर्ण कथा माझ्यासोबत शेअर केली. त्यानंतर ती पडद्यावर साकारण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य मला दिले. त्यांनी कधीही चित्रपट निर्मितीदरम्यान काहीही शंका कुशंका उपस्थित केल्या नाहीत,” असे कबीर खान यांनी सांगितले.
‘83’ हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट ४ जून २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.
‘83’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळली आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पादुकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.