‘कच्चा बादाम’ गाण्यामुळे रातोरात स्टार झालेले भुबन बड्याकार यांचा सोमवारी रात्री अपघात झाला आहे. पश्चिम बंगालच्या बीरभूमी येथे त्यांच्या कारला अपघात झाला. त्यानंर भुबन यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र त्यांना गंभीर दुखापत झाल्यानं प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्या अपघाताच्या वृत्तानं सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांचे चाहते त्यांची प्रकृती लवकर ठीक व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भुबन बड्याकार यांनी काही दिवसांपूर्वीच एक कार खरेदी केली होती. कार चालवायला शिकत असताना त्यांचा अपघात झाला अशी माहिती मिळत आहे. तसेच भुबन यांच्या छातीला गंभीर दुखापत झाल्याचंही बोललं जात आहे. सध्या त्यांना बीरभूमीमधील सुपर स्पेशलिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आणखी वाचा- “मुंबईकर मुंबईबाहेर जातील आणि तुम्हाला…”; अदित्य ठाकरेंना टॅग करत सुमित राघवनने व्यक्त केला संताप

भुबन बड्याकार हे पश्चिम बंगाल येथे राहतात. त्या ठिकाणी ते शेंगदाणे विकण्याचं काम करत असतानाच ‘काचा बादाम’ हे गाणं गात असत. एका व्यक्तीनं ते गाणं गात असताना व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला आणि भुबन बड्याकार रातोरात स्टार झाले.

अलिकडच्या काळात भुबन यांनी मुंबईतील एका मोठ्या हॉटेलमध्ये परफॉर्म देखील केलं होतं. एवढंच नाही तर त्यांनी एका म्यूझिक कंपनीसोबत गाणं गायलं आणि व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला. ज्यातून त्यांना ३ लाख रुपये मिळाले होते. या म्यूझिक कंपनीनं भुबन यांच्यासोबत एक कॉन्ट्रॅक्ट साइन केलं आहे. याशिवाय भुबन यांच्या टॅलेंटसाठी पश्चिम बंगाल पोलिसांनी त्यांचा सत्कार केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kacha badam singer bhuban badyakar car accident suffering injury on chest mrj