एकेकाळी भारतीय चित्रपटसृष्टी गाजवलेले प्रसिद्ध अभिनेते आणि लेखक कादर खान यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच कॅनडा येथे अखेरचा श्वास घेतला. चित्रपटसृष्टीत स्वत:चा ठसा उमटवणारे आणि वेगळी ओळख निर्माण करणारे कादर खान यांचा दमदार अभिनय रसिकांच्या कायम मनात राहील असाच होता. केवळ पडद्यावरच नाही तर अनेकदा पडद्याच्या मागे राहूनही त्यांनी बॉलिवूडमध्ये मोठे योगदान दिले. अभिनेते अमिताभ बच्चन सुपरस्टार बनण्यात कादर खान यांचे महत्त्वाचे योगदान होते. कादर खान यांनी लिहीलेले डायलॉग जेव्हा अमिताभ बोलायचे तेव्हा चित्रपटगृहात टाळ्यांच्या एकच गजर व्हायचा. पाहूयात कादर खान यांनी लिहीलेले असेच काही प्रचंड गाजलेले डायलॉग…
१. ‘बचपन से सर पर अल्लाह का हाथ और अल्लाहरख्खा है अपने साथ, बाजू पर 786 का है बिल्ला, 20 नंबर की बीड़ी पीता हूं और नाम है ‘इकबाल’ – कुली (१९८३)
२. ‘सुख तो बेवफा है आता है जाता है, दुख ही अपना साथी है, अपने साथ रहता है. दुख को अपना ले तब तकदीर तेरे कदमों में होगी और तू मुकद्दर का बादशाह होगा.’ – मुकद्दर का सिकंदर (१९७८)
३. ‘मालिक मुझे नहीं पता था की बंदूक लगाए आप मेरे पीछे खड़े हैं. मुझे लगा, मुझे लगा कि कोई जानवर अपने सींग से मेरे पीछे खटबल्लू बना रहा है.’- हिम्मतवाला (१९८३)
४. ‘आप हैं किस मर्ज की दवा, घर में बैठे रहते हैं, ये शेर मारना मेरा काम है? कोई मवाली स्मग्लर हो तो मारूं मैं शेर क्यों मारूं, मैं तो खिसक रहा हूं और आपमें चमत्कार नहीं है तो आप भी खिसक लो.’ – मिस्टर नटवरलाल (१९७९)
५. ‘ऐसे तोहफे (बंदूकें) देने वाला दोस्त नहीं होता है, तेरे बाप ने ४०साल मुंबई पर हुकूमत की है इन खिलौनों के बल पर नहीं, अपने दम पर.’ – अंगार (१९९२)
६. दारू पीता नहीं है अपुन, क्योंकि मालूम है दारू पीने से लीवर खराब हो जाता है, लीवर.’- सत्ते पे सत्ता (१९८२)
७. ‘विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम, बाप का नाम दीनानाथ चौहान, मां का नाम सुहासिनी चौहान, गांव मांडवा, उम्र ३६ साल ९ महीना ८ दिन और ये सोलहवां घंटा चालू है.’ – अग्निपथ (१९९०)