नागराज मंजुळेच्या सैराट चित्रपटाने सर्वांनाच झिंगाट करून सोडलंय. या चित्रपटातील गाणी, संवाद, लोकेशन्स सर्वांच्याच पसंतीस येत आहे. या चित्रपटात ग्रामीण भाषेचा वापर असला तरी इतर भाषिक प्रेक्षकही हा चित्रपट पाहण्यापासून स्वतःला रोखू शकलेले नाहीत. अगदी बॉलीवूड सेलिब्रेटीही या चित्रपटाची प्रशंसा करतायंत.
सध्या काहे दिया परदेस ही मालिकाही बरीच गाजतेयं. या मालिकेत गौरीची भूमिका साकारणारी सायली संजीव नुकताचं हा चित्रपट पाहून आली. हा चित्रपट पाहिल्यानंतर सायलीने आपण झिंगाट झाल्याचं सांगितलयं. तसेच, शिवची भूमिका साकारणारा ऋषी सक्सेना याच्यासोबतच्या आपल्या सैराट डेटबद्दल सायली काय म्हणाली ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहा.
VIDEO: शिव आणि गौरीची ‘सैराट डेट’
आपल्या सैराट डेटबद्दल सायली काय म्हणाली..
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 25-05-2016 at 07:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kahe diya pardes fame sayali sanjeev and rishi saxenas sairat date plan