‘व्हॉट्सअप’, फेसबुक’ या सोशल नेटवर्किंग साइटवरून अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेता आलोकनाथ, रजनीकांत यांचा ‘भाव’ कमी झाला आहे. त्यांची जागा आता आता झी मराठीवरील लोकप्रिय असलेल्या ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील अभिनेत्री तेजश्री प्रधान ऊर्फ ‘जान्हवी’ने घेतली आहे. या मालिकेत तिच्या तोंडी असलेल्या ‘काहीही हं श्री’ या वाक्यावरून वेगवेगळे विनोद तयार करण्यात येत असून गेल्या काही दिवसांपासून ‘व्हॉट्सअप’वर त्यांचा धुमाकूळ सुरू झाला आहे.
कोणतीही बातमी किंवा घटना सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचे सर्वात वेगवान माध्यम म्हणून सध्या ‘व्हॉट्सअप’चा विशेष बोलबाला आहे. शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार स्त्री-पुरुष, गृहिणी ते आबाल-वृद्धांपर्यंत भ्रमणध्वनीच्या माध्यमातून ‘व्हॉट्सअप’ प्रत्येकाच्या हातात आले आहे. काही दिवसांपूर्वी ‘व्हॉट्सअप’वर आलिया भट्ट ही ‘बकरा’ होती. तिच्यावर तयार केलेले अनेक विनोद वेगाने फिरत होते. ‘संता बंता’, ‘आलोकनाथ’, ‘रजनीकांत’ हे ठरलेले ‘गिऱ्हाईक’ होते आणि आहेतच. तसेच काही दिवस ‘होऊ दे खर्च’ यावरूनही विनोद, व्यंगचित्र ‘व्हॉट्सअप’ व ‘फेसबुक’वरून चालविले जात होते. सध्या ‘काहीही हं श्री’या वाक्याचा आधार घेऊन तयार केलेले वेगवेगळे विनोद एक नंबरवर आहेत.
‘होणार सून मी या घरची’या मालिकेतील अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणजेच मालिकेतील ‘जान्हवी’ आपल्या नवऱ्याशी- ‘श्री’शी बोलताना लाडाने आणि हसून ‘काहीही हं श्री’ असे एक वाक्य हमखास म्हणते. तिचे हे वाक्य लोकप्रिय झाले आहे. मात्र आता याच वाक्याचा आधार घेऊन ‘व्हॉट्सअप’वर वेगवेगळे विनोद फिरत आहेत. काल फिरणारा विनोद हनुमान आणि श्रीकृष्णावरील होता. हनुमान श्रीकृष्णाला ‘मी एका हाताने पर्वत उचलला’असे सांगतात तेव्हा श्रीकृष्ण ‘मी करंगळीवर पर्वत उचलला’ असे उत्तर हनुमानांना देतात. त्यावर हनुमान ‘काहीही हं श्री’असे उत्तर देतात.
वानगी दाखल..
* श्रीकर परदेशी- मी ‘पीसीएमसी’मधील सर्व अनधिकृत बांधकामे पाडणार आहे.
लक्ष्मण जगताप- काहीही हं श्री.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा