पदार्पणातच ‘काय पो चे’ चित्रपटातील आपल्या धडाकेबाज पफॉर्मन्समुळे चर्चेत आलेल्या सुशांत सिंग राजपूतने आणखी एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये प्रवेश केला आहे.
छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिस्ता’ या मालिकेमुळे स्टार झालेल्या सुशांत सिंगने करन जोहरच्या आगामी चित्रपटातही जागा पटकावल्याची चर्चा आहे.
‘काय़ पो चे’ चित्रपच प्रदर्शित होण्याआधीच सुशांत सिंगने अमिर खान, सोनम कपूर यांसारख्या बड्या कलाकारांसोबत चित्रपट साईन केले आहेत. तसेच यश राज फिल्मच्या एका चित्रपटासाठीही परिणीती चोप्रा सोबत चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरवण्यात आलेले नाही.
त्य़ामुळे सुशांत सिंगने आता मोठ्या पडद्यावर जम बसवण्याच्या दिशेने पावले उचलल्याचे दिसत आहे.
     

Story img Loader