बॉलिवूडमध्ये #MeToo मोहीम सुरू झाल्यानंतर अनेक महिला समोर येऊन आवाज उठवत आहेत. यामध्ये इंडस्ट्रीतील धक्कादायक नावं समोर येत आहेत. प्रसिद्ध गायक कैलाश खेरवर एका महिला पत्रकाराने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. कैलाश खेरने त्या महिलेचे आरोप फेटाळत मला अशी कोणतीही घटना लक्षात नाही आणि माहितसुद्धा नसल्याची प्रतिक्रिया दिली.

‘त्या महिलेच्या आरोपांमुळे मला मोठा धक्काच बसला. मला अशी कोणतीही घटना घडल्याचं आठवत नाही आणि माहित नाही. मी माणुसकीवर पूर्ण विश्वात ठेवतो आणि विशेषकरून महिलांचा आदर करतो,’ असं कैलाश म्हणाला. कैलाश खेरच्या घरी मुलाखतीसाठी गेली असता त्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप महिला फोटोग्राफरने केला होता. ट्विटरच्या माध्यमातून तिने हा धक्कादायक खुलासा केला होता.

#MeToo : ‘स्त्री’ चित्रपटाच्या अभिनेत्रीनेही दाखवली बॉलिवूडची काळी बाजू

‘मी स्त्रियांचा किती आदर करतो हे मला ओळखणाऱ्यांना व्यवस्थित माहित असेल. प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या महिलांचा तर मी सर्वाधिक आदर करतो, कारण त्यांचं काम खूपच अवघड असतं,’ असं IANSला दिलेल्या मुलाखतीत कैलाशने स्पष्ट केले. बॉलिवूडमध्ये सुरू झालेल्या ‘#MeToo’ मोहिमेत दिग्दर्शक विकास बहल, कैलाश खेर, अभिनेता रजत कपूर, नाना पाटेकर, आलोक नाथ अशी मोठी नावं समोर आली आहेत.

 

Story img Loader