‘सिंघम’ चित्रपटातून अनेकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणून काजल अग्रवालला ओळखले जाते. तिने २०२० मध्ये उद्योगपती गौतम किचलूशी लग्न केले. अवघ्या दोन दिवसांपूर्वी काजलने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मंगळवारी १९ एप्रिलला काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नुकतंच काजलने तिच्या बाळाच्या नावाचा खुलासा केला आहे.

काजल अग्रवालचे पती गौतम किचलू यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुलगा झाल्याच्या बातम्यांना दुजोरा दिला आहे. त्यासोबतच त्यांनी या पोस्टद्वारे बाळाचे नावदेखील उघड केले आहे. “आम्हाला तुम्हाला सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की १९ एप्रिल २०२२ रोजी नील किचलूचा जन्म झाला”, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Good News! बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवालच्या घरी आला ‘छोटा पाहुणा’

त्याच्या या पोस्टद्वारे काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांनी त्यांच्या बाळाचे नाव नील असे ठेवले आहे. त्यासोबत त्यांनी त्या पोस्टमध्ये आजी आजोबांसह सर्व कुटुंबियांची नावेही त्यात लिहिली आहेत. ही पोस्ट करताना काजलने म्हटले की, मी खूप आनंदी आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादांसाठी खूप खूप धन्यवाद.

“मला माफ करा, मी यापुढे…”; पान मसालाच्या जाहिरातीवरुन ट्रोल झाल्यानंतर अक्षय कुमारने दिले स्पष्टीकरण

काजल आणि गौतम यांनी ३० ऑक्टोबर २०२० रोजी लग्न केले. मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. काही कलाकरांनी देखील त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. काजल आणि गौतम जवळपास ७ वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. ती नेहमी तिच्या पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करताना दिसते.