कॉमेडियन भारती सिंहपाठोपाठ बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवाल आई बनली आहे. नुकतंच काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. काजल अग्रवालने मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेकांनी त्यांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

‘सिंघम’ चित्रपटातून अनेकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणून काजल अग्रवालला ओळखले जाते. तिने २०२० मध्ये उद्योगपती गौतम किचलूशी लग्न केले. लग्नानंतर दोन वर्षांनी ते आता ते दोघेही आई-बाबा बनले आहेत. काजल आणि गौतमच्या घरी एक छोटा पाहुणा आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अद्याप त्या दोघांनी याबाबत काहीही माहिती दिलेली नाही.

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…

“व्हायरस परत आलाय…!!!” अभिनेत्री मुक्ता बर्वेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘बॉलिवूड बबल’ने दिलेल्या रिपोर्टनुसार, काजल अग्रवालने नुकतंच मुलाला जन्म दिला आहे. काजल आणि गौतमचे हे पहिलेच बाळ आहे. त्यामुळे ते दोघेही फार खूश आहेत. मात्र, या वृत्ताला काजल आणि गौतमकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही. तसेच तिने बाळाला कधी जन्म दिला, काजलची तसेच बाळाची प्रकृती कशी आहे याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण ही बातमी मिळाल्यानंतर अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वयंपाकघरात काम करत असताना अभिनेत्री ऋतुजा बागवे झाली जखमी, म्हणाली “माझा चेहरा…”

काजल आणि गौतम यांनी ३० ऑक्टोबर २०२० रोजी लग्न केले. मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. काही कलाकरांनी देखील त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. काजल आणि गौतम जवळपास ७ वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. ती नेहमी तिच्या पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करताना दिसते.

Story img Loader