रोहित शेट्टीच्या ‘दिलवाले’ चित्रपटाच्या हैदराबादयेथील चित्रिकरणात व्यस्त असलेल्या शाहरूख खानने काजोल आणि आपण जगातील अत्यंत वाईट डान्सर असल्याची प्रामाणिक कबुली दिली आहे. काजोल या चित्रपटात शाहरूखची सह-कलाकार आहे. अलीकडेच त्यांच्यावर चित्रपटातील नृत्याचे एक दृश्य चित्रित करण्यात आले. मोठ्या पडद्यावर यशस्वी ठरलेल्या काजोल आणि शाहरूखच्या जोडीने ‘बाझीगर’, ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’सारखे अत्यंत यशस्वी चित्रपट दिले आहेत. त्यामुळेच रसिक ‘दिलवाले’ या त्यांच्या आगामी चित्रपटाची अतुरतेने वाट पाहात आहेत.

Story img Loader