बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे. सध्या सोशल मीडियावर काजोलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती बहिण तनिषा मुखर्जीशी भांडताना दिसत आहे. नेमकं काजोल आणि तनिषामध्ये कशावरुन भांडण झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा काजोलचा व्हिडीओ हा दुर्गा पूजेच्या वेळचा आहे. काजोलने निळ्या रंगाची साडी नेसली आहे तर तनिषाने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. दोघीही या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. दरम्यान, भर मंडपात काजोल आणि तनिषा यांच्यामध्ये वाद झाल्याचे दिसत आहे. काजोल तनिषाला ‘शांत बस’ असे बोलताना दिसत आहे.
आणखी वाचा: ९ वर्षांच्या चिमुकलीने केली ‘दयाबेन’ची नक्कल, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
तसेच काजोलची आई तुनजा या दोघींना शांत करताना दिसत आहे. तनुजा या काजोल आणि तनिषाला समजावताना दिसतात. त्यानंतर त्या तिघीही एकत्र फोटो काढतात. काही दिवसांपूर्वी तनुजा, काजोल आणि तनिषा यांचे दुर्गा पूजेमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता सध्या त्यांचा हा भांडणाचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.