अभिनेत्री काजोल बॉलिवूडच्या दमदार अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. एवढंच नाहीतर काजोल आणि अजय देवगण ही जोडी देखील मोठ्या पडद्यावरील एक हिट जोडी आहे. दोघांनीही बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दोघंही एक आदर्श जोडी म्हणून अनेकांची प्रेरणा आहेत. पण एक वेळ अशीही आली होती जेव्हा बॉलिवूडच्या या लोकप्रिय जोडीमध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे वाद निर्माण झाले होते आणि या अफेअरच्या चर्चा ऐकल्यानंतर काजोलने अजय देवगणला अक्षरशः धमकी देखील दिली होती. अभिनेत्री काजोलचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने जाणून घेऊयात या दोघांमध्ये नेमकं काय घडलं…

अजय देवगण आणि काजोल बॉलिवूडच्या आदर्श आणि लोकप्रिय जोड्यांपैकी एक असले तरी कधी या दोघांच्या संसारतही वादळ आलं होतं. एका प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे काजोल आणि अजय यांच्यात वाद सुरू झाले होते मात्र काजोलनं वेळीच सर्व गोष्ट व्यवस्थित सांभाळत आपला संसार सांभाळला होता. एवढंच नाही तर तिने अजय देवगणला घर सोडून जाण्याची धमकी देखील दिली होती.

laxmi narayan tripathi on mamta kulkarni
ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर केलं अन् तिच्यासह झाली हकालपट्टी; त्रिपाठी म्हणाल्या, “तिने इस्लाम…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
paaru fame Sharayu Sonawane revealed the reason behind hiding her marriage
पारूने खऱ्या आयुष्यातलं लग्न का लपवून ठेवलं होतं? कारण सांगत म्हणाली, “अचानक मी…”
poonam panday visits mahakumbh mauni amavasya
Video : “माझी सर्व पापं धुतली गेली”, पूनम पांडेने मौनी अमावस्येला गंगेत केले स्नान; महाकुंभातील चेंगराचेंगरीबद्दल म्हणाली…
when mamta kulkarni had fight with ameesha patel
“स्टार कोण? तू की मी?” ममता कुलकर्णीने भर पार्टीत केलेली शिवीगाळ, मध्यस्थी करणाऱ्या ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीला…
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
Kshitee Jog
क्षिती जोगने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिका का सोडलेली? अभिनेत्री म्हणाली, “खूप चुकतंय…”
karan veer mehra second wife got married
करण वीर मेहराच्या दुसऱ्या बायकोने केलं लग्न, अभिनेत्रीने मंदिरात बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

आणखी वाचा- पहिल्या भेटीनंतर अजयला पुन्हा पाहायचं नव्हतं काजोलचं तोंड, पण…

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मध्यंतरीच्या काळात अजय देवगण अभिनेत्री कंगना रणौतशी जवळीक वाढल्याने चर्चेत आला होता. अजय कंगनासोबत ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई’चे शूटिंग करत असताना त्यांच्यात जवळीक वाढली. तो बराच वेळ कंगनासोबत व्यतित करत असे. या दोघांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा त्यावेळी सुरू होत्या. या सर्व गोष्टींमुळे अजय आणि काजोलच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण झाल्या होत्या. काजोल आणि अजय यांच्यात वाद झाल्याच्याही चर्चा होत्या.

जेव्हा काजोलला याबद्दल समजलं तेव्हा तिने अजयला त्यावरून बरंच सुनावलं होतं आणि घर सोडून जाण्याची धमकी दिली होती असं म्हटलं जातं. त्यानंतर एका मुलाखतीमध्ये अजयने विवाहबाह्य संबंधांबद्दल वक्तव्य केलं होतं. अजय म्हणाला होता, “मी असं म्हणत नाही की विवाहबाह्य संबंध होत नाहीत. परंतु, कधीकधी प्रसार माध्यमं दोन लोकांना एकत्र पाहिल्यानंतर चुकीचा अर्थ लावतात. मी माझे नाव कोणाशीही जोडू देत नाही. मला माझे काम आवडते आणि ते झाल्यावर मी सरळ घरी येतो.”

आणखी वाचा- अजय देवगणने उडवली काजोलची खिल्ली, व्हिडीओ शेअर म्हणाला “आज आणि दररोज…”

दरम्यान १९९५ मध्ये ‘हलचल’ चित्रपटाच्या दरम्यान अजय आणि काजोलची पहिली भेट झाली होती. अजय आणि काजोलने चार वर्ष एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अजयच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नासाठी होकार दिला होता. मात्र काजोलने घरी सांगताच तिच्या वडिलांनी तिच्यासोबत चार दिवस बोलणे बंद केले होते. काजोलने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करावं असं तिच्या वडिलांना वाटत होतं. पण नंतर काही दिवसांनी काजोलच्या घरातील देखील लग्नासाठी तयार झाले. त्यांनी १९९९मध्ये लग्न केलं. अतिशय खासगी पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पाडला. अजय आणि काजोलच्या लग्नाला काही मोजक्याच लोकांनी हजेरी लावली होती.

Story img Loader