बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही तिच्या स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत असते. काजोल सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. अनेकवेळा तर चाहत्यांनी विचारलेल्या आयुष्यातील अनेक प्रश्नांवर उत्तर देते. मंगळवारी एका चाहत्याने काजोलला बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीबद्दल विचारले. राणी सोशल मीडियावर सक्रिय का नाही असा प्रश्न विचारणाऱ्याला चुलत बहिण काजोलने मजेशीर उत्तर दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून वुमन्स डे निमित्ताने चाहत्यांशी संपर्क साधला होता. तेव्हा एका नेटकऱ्याने काजोलला प्रश्न विचारला की “कृपया राणी मुखर्जी विषयी काही सांगा, ती इन्स्टाग्रामवर का नाही आणि महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.” यावर मजेशीर उत्तर देताना म्हणाली, “हा खूपच गंभीर प्रश्न आहे. मी आताच राणीला फोन करते.” दरम्यान, महिला दिनाच्या निमित्ताने काजोलने सगळ्याच प्रश्नाची उत्तरं दिली आहेत.

आणखी वाचा : जिनिलिया माहेरी जाणार ऐकताच, रितेश देशमुखने गायलं हे गाणं; Video पाहून हसू आवरणार नाही

आणखी वाचा : तैमूरने वडील सैफ अली खानवर उचलला हात, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “अमीर बाप की…”

राणी मुखर्जी सोशल मीडिया आणि बॉलिवूड पार्टीपासून लांब असते. फक्त राणीच नाही तर तिचा नवरा आदित्य चोप्रा देखील सोशल मीडियापासून लांब राहतो. त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. राणी आणि आदित्य चोप्रा यांना एक मुलगी असून तिचं नाव आदिला आहे. तर राणी आणि आदित्य या दोघांना त्यांचे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवतात.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kajol funny responds to fan who asked why rani mukerji was not on instagram dcp