बॉलीवूड अभिनेत्री काजोलला मायटी मॉम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘छोटा भीम’ आणि ‘माइटी राजू’ या लहान मुलांच्या कार्टुनचे बनवणारे ग्रीन गोल्ड अ‍ॅनिमेशनने ३९ वर्षीय अभिनेत्रीला सन्मानित केले आहे. काजोलने अभिनेता अजय देवगण विवाह केला असून त्यांना न्यासा आणि युग ही दोन मुले आहेत.
आपल्या मुलांच्या स्वभाव, क्रोध आणि मनस्थितीशी जुळवून घेताना प्रत्येक आई ही प्रबळ आई (माइटी मॉम) असते. त्यामुळे प्रत्येक आईला हा पुरस्कार द्यायला हवा, असे काजोल म्हणाली. यावेळी काजोल पिवळ्या रंगाचा टॉप आणि फुलांची प्रिंट असलेला स्कर्ट परिधान केला होता. या कार्यक्रमावेळी ‘माइटी राजू रियो कॉलिंग’ या आगामी चित्रपटाचा काजोलने ट्रेलर लाँच केला.